जस्ट मॉल मध्ये कॉफी ढोसत होतो
समोर ते दोघे बसलेले दिसत होतं
खूप खुश होते
मधूनच एकमेकांना
घास देत होत,
बघून बरे वाटले,
तर दुसरीकडे एक
कुटूंब खाण्याचे फोटो
काढत व्हाट्स अप,
इंस्टा, fb वर पोस्ट करत होते
तर बाजुला चार जण
वाढदिवस सेलिब्रेट करत होते
कुठेही दुःख ,क्लेश दिसत नव्हते
समोरची काउंटर वरची मुलगी
मात्र अत्यंत तत्परतेने कस्टमर्सना
सर्व करत असते आणि स्वतः कॉफीचे
घुटके घेत होती.
विचार आला प्रत्येकाचे भाव
विश्व त्याच्या त्याच्या
भोवती फिरत होते
तितक्यात ती आली
सॉरी उशिर झाला
ट्रेन लेट होती.
स्वतःचा बाटलीतले
पाणी प्यायली, फ्रेश झाली
मी म्हणालो आधी खाऊन घेऊ
ओके , ती म्हणाली.
गप्पा होत होत्या,
बऱ्याच विषयांवर गप्पा
झाल्यावर तीच म्हणाली.
कुठे जायचे
मी म्हणालो इथेच
ती चमकली तिच्या नजरेत
दिसत होते हा काय
येडा आहे का ?
म्हणाली , तुम्ही मला
एकदम 5000 रुपये दिलेत ना
मग हे काय
मग काय वसूल करायलाच
हवेत का. ती कोण होती ते मला माहित होते .
तिला ते रुटीन होते …जस्ट कॉम्प्रो
तिचा हात हातात घेत म्हणालो
काही नाही आनंदी रहा…
तिला काहीच कळेना
मी असा काय वागतोय
परंतु मी अगदी बरोबरच
वागत होतो…
कारण ती माझ्या
जी एफ ची मुलगी होती
पण माझी नव्हती…..
सतीश चाफेकर
Leave a Reply