फोल्डिंगच्या खुर्च्या बघितल्या होत्या. पण भिंतीत घडी होणाऱ्या खुर्च्या सरळ भिंतीत उभ्या राहतात आणि छोटेखानी दिवाणाची जागा मोकळी होते. भिंतील खेटून उभ असलेल पुस्तकाच कपाट रात्र झाली की आडव होत
अत्यंत गर्दीच्या वेळी ते गृहस्थ डब्यात शिरले. त्यांच्या हातात भाल्यासारखी चकाकणारी वस्तू होती. आजूबाजूचे लोक नकळत बाजूला सरकले. न जाणो ती तीक्ष्ण वस्तू लागली तर आणि त्या गर्दीत ती वस्तू घेऊन उभ्या राहिलेल्या त्या माणसाकडे आली कुठून. हा तरी परग्रहावरुन आलेला जिवाणू असावा, अशा पध्दतीने पाहत राहिले. कदाचित तो मुंबईबाहेरचा असावा.
त्याच हातात लांब दांडीची भलीमोठी फुलसाईज छत्री होती. मला वाटत बऱ्याच वर्षांपासून तिचं मुंबई शहरातून स्थलांतर झालेले असाव. शाळेतल्या मुलाना ही छत्री आहे म्हणून सांगितल तर खर वाटणार नाही. ती आता बहुतेक वस्तुसंग्रहालयातच ठेवण्यात आली असावी.
मुंबईत पडणारा पाऊस हा सरळ संथपणे रिपरिप कधीच पडत नाही. तो तिरका पडतो. सतत वाऱ्याला बरोबर घेऊन येतो आणि पडता तर जोरात पडतो. त्यमुळे खर तर घडीच्चा छत्र्या तशा कुचकामी असतात. पण घर ते स्टेशन-ऑफिस किंवा कुठेही जायच असेल, तर बस, लोकल, टॅक्सीतून नेण्यासाठी सोयीस्कर वस्तू म्हणजे घडीची छत्री. बर ही छत्री नुसती घडीची असून चालत नाही. ती बटन दाबल की उघडली पाहिजे. नाहीतर तेवढया वेळात माणूस ओलाचिंब होणार. मोठी छत्री षेऊन लोकलमध्ये शिरणार कस काय? आणि सगळयांनीच लांब दांडयाच्या टोकदार छत्र्या वापरायच ठरवल तर किती लोक मृत्यूमुख्याी पडतील आणि किती घायाळ होतील याचा विचारच करुन पाहा. युध्दात सुध्दा जीव तोडून सैनिक हल्ला करत नसतील तितक्या वेगाने स्टेशमध्ये प्रवेश करणाऱ्या गाडीवर प्रवासी तुटून पडतात. त्यांच्या हातात लांब दांडयाच्या छत्र्या दिल्या तर रामायण- महाभारत सीरियलमधील युध्दाचे प्रसंग प्रत्यक्ष पाहण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे घढीच्या छत्रीला पर्याय नाही. जेवढया जास्त घडया तेवढी अधिक सोय. एका मित्राने परवा चार घडीची छत्री विकत घेतली. पावसातून आला, फटाफट बटन दाबून त्याने तिची चौथी घडी पाडली आणि क्षणार्धात ती छत्री त्याच मुठीत नाहीशी झाली. तिच प्लॅस्टिक कव्हर घालून ती त्याने वरच्या शर्टाच्या खिशात ठेवली आणि तरातरा निघून गेला.
त्याच्या छत्रीच कौतुक केल तर तो पिसाळला. छत्रीच काय घेऊन बसलाय. इथं सगळयाच गोष्टी घडीच्या आहेत. घडी केली नाही तर चालणार कस. इथे एैसपैस मोकळ- चाकळ काही नाही. फटाफट घडी करा आणि चालते व्हा. असे म्हणत तो निघून गेला. कारण त्याची मुलाखतीची वेळ चुकली असती. त्यानंतर पाच-सहा वेळा तो असाच भेटला. त्यावेळी त्याने आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी घडीच्या आहेत त्याची सविसतर माहिती सांगितली. तसा माणूसच आटोपशीर घडीचा वाटला आणि लक्षात आल चारघडीच्या छत्रीवाल्या मित्राप्रामणे इथै सगळेच लोक घडीचे जीवन जागत आहेत. फक्त त्यांच्याकडे घडीच्या वस्तू असतील किंवा नसतील काम झाल की प्रत्येक वस्तूची घडी करुन जागेवर जाणार. कारण परत केव्हा लागेल याचा भरवसा नाही आणि ठेवायला जागा नाही.
पत्ता लिहून देण्यासाठी पेन काढला तो घडीचा. घरात अनेक वस्तू घडीच्या आहेत. फोल्ंडिग टेबल बघितल होते. फोल्डिंगच्या खुर्च्या बघितल्या होत्या. पण भिंतीत घडी होणाऱ्या खुर्च्या सरळ भिंतीत उभ्या राहतात आणि छोटेखानी दिवाणाची जागा मोकळी होते. भिंतील खेटून उभ असलेल पुस्तकाच कपाट रात्र झाली की आडव होत आणि त्याचा उपयोग दिवाणासारखा झोपण्यासाठी होतो. ऑफिसात जाताना त्यांच्या हातात मोठा टिफीन बॉक्स असतो. पण परत जाताना काही दिसत नाही. कारण तो सुध्दा घडीचा आहे. घडी करुन लहानशा बटव्यात बसू शकतो. चष्म्याच्या काडयाही घडीच्या आहेत. ठेवायला कमी जागा लागते. खिशात मावतो.
कधी कधी वाटत, घडीच्या जीवनाची या माणसाला इतकी सवय झाली आहे की, त्याची घडी करुन सहजपणे अपल्या खिशात त्याला टाकता येईल.
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक ८ सप्टेंबर १९९४
Leave a Reply