घन आभाळी सर पावसाळी
तू येशील कधी सख्या मी बावरी,
ये हलकेच सख्या त्या धुंद वेळी
वाट पाहू किती आरक्त मी होऊनी..
मोहरले मन वेल्हाळ होऊनी
ये असा अलगद तू कातर वेळी,
मी येते अलगद चोर पाऊली
पाऊस सरी बरसतील त्या वेळी..
घे घट्ट मिठीत ओढून तू मजला,
अधर रोमांच उठतील गाली तेव्हा,
ओठ टिपून घे अलवार त्या क्षणी
साखर चुंबन होईल ते लव्हाळी..
सर सर येईल अंगावरी काटा
तुझा स्पर्श होईल मोहक मजला,
ओढ तुझ्या मिठीत मुग्ध व्हावी
पाऊस सर ही दोन मनं भिजावी..
बाहुत तुझ्या मी आल्हाद येता
तू घट्ट मिठीत मज ओढून घेता,
आभाळी वीज ती चमकावी
अलवार तुझ्यात मी समरस व्हावी..
हा घन आषाढ बरसतो हलकासा
छेडतो मनास मजला भलत्या वेळा,
ओठ ओठांना भिडतील मोहरुनी तेव्हा
पाऊस वेल्हाळ दोघांत रिमझिम असा..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply