घनदाट त्या वृक्षाखाली,पांथस्थ विश्राम करे,
दमुनी भागुनी थकुनी,
आपले ठेवे ओझे खाली,–!!!
माथ्यावर उन्हे तळपती,
सावलीत आश्रय घेत असे,
थंडगार पाणी पिऊनी,
तहान तो भागवत असे,–!!!
वाटसरू तो गरीब बिचारा,
त्याच्या भुकेलाही धोंडे,
पाणीच भूक भागवे,
सोडवीत पोटाचे कोडे,–!!!
गाठोडे आपले घेऊन डोई,
पांथस्थ हात-पाय पसरे,
डोळे मिटुनी जमिनीवरी,
शांत निवांत होऊन पहुडे,–!!!
निद्रादेवी रुंजी घाली,
भोवती त्याच्या चहुकडे,
वरुन पानांची नक्षी,
उन्हात संरक्षण कडे,–!!!
खेळ चाले, ऊन–सावली, पांथस्थाच्याही मनी चाले,–
पोट मारुनी कसे जगावे,
वाटे चिंताही त्याला भारी,–!!!
टपकन पडे, वरून खाली,
थेट पांथस्थाच्या अंगावरी,–
झाड देई फळ आपुले,
पांथस्थ आपली भूक भागवी,–!!!
*अनेक गोष्टी निसर्ग शिकवे,
मानवा तुला कळत नाही,
देऊन समाधान असते,
घेण्यात ना ठेवले काही*,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply