देवळात प्रथम तान्ह बाळ ऐकतं ,तेव्हा मोठा आवाज ऐकून घाबरून रडतं…
नंतर थोडं मोठं झाल्यावर बाबांच्या कडेवरून हात उंचावून घंटा वाजवू शकतं तेव्हा समाधानानी हसतं .. आणि मग घंटा वाजवतच रहातं..
मग उड्या मारून हात पोचतो..घंटा वाजवतो..
नंतर कायम देवळात आलं की भक्तीभावानी घंटा वाजवलीच जाते.. हा एक संस्काराचा भाग होऊन जातो…
तो आवाज सांगतो..
मनातले विचार बाहेर ठेऊन मग शांत मनानी आत या…दुष्ट विचारांना तो पळवून लावतो..
पवित्र वातावरण निर्माण करतो…
आरती करतांना , पूजा करतांना हातातली छोटी घंटी वाजत रहाते .. देवळातली मोठी घंटा वाजत रहाते.हिंदू , बौध्द , जैन ख्रिश्चन धर्मात घंटेला खूप महत्व आहे.फार पुरातन काळापासून त्यांचा उल्लेख पहायला मिळतो.
अशा अनेक प्रकारच्या मोठाल्या घंटा आपल्याला पहायला मिळतात..
घरातल्या पूजेच्या छोट्या घंटा ..पितळ, तांब, स्टिल, चांदी पंचधातूच्या असू शकतात.
बाहेरच्या मोठ्या घंटाही मिक्स धातूच्या असतात.काही शोभेच्या,लाकडाच्या,
सिरॅमिक्स, काचेच्या मातीच्याही असतात.
मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण असं आपण नेहमी ऐकत आलो , ती घंटा कोणीच कसली असते पाहिली नाही , पण बैलांच्या गळ्यातली घंटा नक्की ऐकली असेल.
काही हातातल्या घंटेवर लाकडी मूठ असते . काही घंटेवर गरूड असतो.
शाळेतली घंटा तर कोणीच विसरू शकणार नाही.घंटेच्या वेगळ्या आकारामुळे आणि मधल्या , हलणाऱ्या दांडी मुळे , त्याच्या बाजूला आपटण्याच्या आवाजामुळे. घंटेतून वेगवेगळे आवाज येऊ शकतात. सा रे ग म प असाही आवाज येऊ शकतो आणि ओम असाही आवाज येऊ शकतो..
पूजेच्यावेळी घंटा सतत वाजत असतांना त्यातून येणारी कंपनी दूर पसरतात, छोटे जीव जंतू घाबरून पळतात, आजूबाजूचे वातावरण शुध्द पवित्र होते… घंटा वाजवताना एक सारखा नाद, एक लय साधली जाते , ज्या मुळे मनाला शांतता मिळते.
अयोध्या नगरीत सध्या मोठाल्या घंटा येत आहेत. तामिळनाडूहून ४५०० किलोमिटरचे अंतर पार करून एक ६३० किलोची घंटा आली आहे . तिचा आवाज ८ किलोमिटर पर्यंत लांब जाणार आहे.
जलेसर , एटा ही गांव घंटा बनवण्यासाठी प्रसिध्द आहेत.
एक धंटा २१०० किलोची आहे. १० लाखाहून जास्त तिची किंमत आहे. ६फूट उंच आणि ५ फूट रूंद अशी ही घंटा आहे.काम करणारे कारागिर इकबाल आणि शमशुद्दीन आहेत.
घंटा जमवणं, विविध घंटेचे फोटो काढणे हा माझा एक छंद आहे.
Leave a Reply