घराने घरासारखे असावे
उगाच गुर्मी करण्याचा प्रयत्न करू नये
हॉटेलची रूम कितीही पॉश असली तरी
खरे मन आणि पाय घरातच
पसरायचे असतात.
गम्मत अशी आहे की आमचे मन
फार हट्टी असते,
कधीकधी घराचे घरपण मानतच नाही
अनेकवेळा घर स्वप्नात येते
हॉटेलची खोली नाही की पॉश रूम नाही
दुसऱ्याचे घर, हॉटेलची रूम कितीही
आकर्षक असो
मला मात्र तेथे झोप लागत नाही
असे का याचे उत्तर माझ्याकडे आहे
कारण ते घर आहे जे माझ्या
मनातल्या घरासारखे असते
एखाद्या कोलाज प्रमाणे
आणि त्या कोलाजमुळे
मी आज उभा आहे
अस्ताव्यस्तपणे
खऱ्या शब्दांची अस्ताव्यस्त मांडणी करताना
मला खूप बरे वाटते
कारण मी माझ्या अस्ताव्यस्त
आयुष्यात खुप सुखी असतो
एखाद्या गर्द झुडुपात आतमध्ये असलेल्या रानटी फूलप्रमाणे
सतीश चाफेकर
Leave a Reply