दगड़ा मातीच्या विटांनी
उभारलेल्या चार भिंतित
मनातलं घरपण सजलयं
फुलदाणीच्या फुलांफुलात…..
सुखाला शोधित शोधित
दुःखांना निवारत निवारत
जणु सप्तरंगली सावलीच
उतरलीय नभातून अंगणात….
पण मन माझं भिरभिरतय
एकटंच निरभ्र नभांगणात
उरि, प्रारब्धाला कवटाळत
गुंतलय ऋणानुबंधी पाशात….
काळ, झरझर सरतो आहे
मनामनांत, मनेही गुंतलीत
सारं काही छान होणार आहे
हा भाव जपला आहे अंतरात….
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४०
१९/९/२०२२
Leave a Reply