नवीन लेखन...

ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – १

GHAZAL AND SWAR-KAFIYA - Part 1

नोव्हेंबर २०१७ ला वाशीमध्ये भरलेल्या ग़ज़ल संमेलनात प्रेक्षकांमधील एका गृहस्थानें  (जो स्वत: कवी व गझलकार आहे) , स्वर-काफियाबद्दल प्रश्न विचारला असतां, मंचावरील ज्येष्ठ ज्ञानवंतांनी उत्तर दिलें की,  ‘शक्यतो स्वर-काफिया वापरूं नये, शुद्ध-काफिया वापरावा’.

त्या विचाराशी मी स्वत: सहमत नाहीं.

( टीप  :  कुठल्याही ज्ञानवंताचा अधिक्षेप करायचा माझा किंचितही उद्देश नाहीं . मात्र, त्यांनी मांडलेल्या उत्तरापेक्षा माझें मत भिन्न आहे. इंदौरला हायस्कूलमध्ये असल्यापासून, गेली ५७-५८ वर्षें मी उर्दू-हिंदी शेरोशायरी वाचत आलेलो आहे. भिन्नभिन्न भाषांमधील ग़ज़ला वाचून ;  हिंदी-हिंदुस्तानी-उर्दू, मराठी व इंग्लिश भाषांमधील ‘जानेमाने’ समीक्षकांच्या ग़ज़लविषयक ग्रंथांचें वाचन-मनन करून; गेली पंचवीस-तीस वर्षें  स्वत: मराठी-हिंदी/हिंदुस्तानी-इंग्रजी ग़ज़ला व ग़ज़लांवर लेख लिहून; आणि स्वत: चिंतन करून, मी माझें मत बनवलेलें आहे. )

वाचकांसाठी मी या विषयावरील माहिती पुढे  मांडत आहे .

विभाग – १

ग़ज़लच्या व्याकरणाची अल्प माहिती :

ग़ज़लच्या  ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या.

ध्यानात घ्या, आपण ग़ज़लच्या व्याकरणाच्या खोलात जाणार नाहीं आहोत ; फक्त आपल्या विषयापुरती माहितीच बघणार आहोत.

  • गज़लमध्ये साधारणतया ५ किंवा अधिक शेर ( द्विपदी ) असतात. प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असतो.
  • प्रत्येक ओळीला ‘मिसरा’ म्हणतात.
  • ( पहिल्या व दुसर्‍या मिसर्‍याला काय नांव आहे, तसेंच ते कशा प्रकारें लिहिलेले असतात, त्यांची खासियत काय ; मक़्ता, वज़न , बह्,र,  अशा अनेक गोष्टींची माहिती  आपल्याला देतां-घेतां येईल;  पण तूर्तास, आपल्या चर्चेसाठी त्यांची आवश्यकता नाही) .
  • गज़लमध्ये दोन प्रकारची यमकें असतात. ‘अंत्ययमक’ म्हणजे खरें तर एक शब्द किंवा शब्द-समूह असतो. त्याला ‘रदीफ’ म्हणतात. (मूलत: अरबी-फारसी-उर्दूमध्ये हा शब्द स्त्रीलिंगी आहे ; पण मराठीत हल्ली तो शब्द पुल्लिंगी वापरायची प्रवृत्ती वाढलेली आहे ).
  • अंत्ययमकाच्या आधी आणखी एक यमक येतें , ज्याला काफिया म्हणतात. काफियात, शब्दाची अखेरचें अक्षर ( किंवा शब्दाच्या  अखेरची कांहीं अक्षरें) अपरिवर्तनीय रहातात, आणि त्याआधीची अक्षरें बदलतात.
  • पहिल्या शेरला ‘मत्ला’ म्हणतात. ( यावरून मराठीत ‘मथळा’ हा शब्द आला आहे). मत्ल्याच्या दोन्हीं मिसर्‍यांमध्ये ( ओळींमध्ये) रदीफ व काफिया असतात.

( कांहीं वेळा, ग़ज़लमध्ये एकाहून अधिक मत्ले असतात. मात्र , तूर्तास , आपण त्या बाबीत शिरणार नाहीं आहोत).

  • अन्य शेरांच्या पहिल्या पंक्तीत रदीफ-काफिया नसतात ; मात्र दुसर्‍या ओळीत ते असतात.
  • प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असला तरी, सर्व शेर एकमेकांशी रदीफ-काफियानें जोडलेले असतात.

कांहीं उदाहरणें :

रदीफ-काफियाचें एक उदाहरण पाहूं या.

( हे माझ्या एका हिंदुस्तानी गज़लचे कांहीं शेर आहेत. हिची पूर्वप्रसिद्धी, ‘येवा कोंकणात’ पाक्षिक, दि. ११.११.२०१७ ) –

मत्ला :

क़ाबू में नहीं मेरे, उस मन का क्या करूँ ?
उस दिल चुरानेवाले दुश्मन का क्या करूँ ?

पुढील कांहीं शेर :

वो ना दिखते , न सही ; पर अक्स तो दिखे
खिड़कीतले छुपा मैं, दर्पन का क्या करूँ ?

आग़ोश में आने को वो आगे बढ़ते भी
उड़ उड़ के बीच आए दामन का क्या करूँ ?

मैं दर्दे जिगर अपना दुनिया से छुपाता
पर आँख से बरसते सावन का क्या करूँ ?

( शब्दार्थ : अक्स : प्रतिबिंब ; आग़ोशआ: आलिंगन ;  दामन : मूल अर्थ ‘कमीज़ का आगे का छोर’ , मगर भारत में ‘आँचल’ यह अर्थ भी लिया जाता है । )

इथें ‘क्या करूँ’ हा शब्द-समूह रदीफ आहे.

काफियासाठीचे शब्द  आहेत – मन, दुश्मन, दर्पन, दामन, सावन.

आतां स्वर-काफियाचें एक उदाहरण पाहूं या, म्हणजे पुढील चर्चा सोपी जाईल.

( हें उदाहरण म्हणजे माझ्याच एक गज़लमधील कांहीं शेर आहेत . पूर्वप्रसिद्धी : वरीलप्रमाणेंच).

इश्क़ ज़िंदगी है,  इश्क फ़ना भी है
इश्क़ के लिये जान दी, जान ली है ।

इश्क ख़ुदा भी है, इश्क ख़ुदी भी है
अवतारे इश्क़ पे ही टिकी ख़ुदाई है ।

इश्क़ मुश्क़ है, इश्क़ पे फ़ख़्र है
शख़्स, दे सदा, ‘इश्क़ ही बंदगी है’ ।

(शब्दार्थ : फ़ना : मृत्यु ;  ख़ुदी :  स्वाभिमान, अस्मिता ; ख़ुदाई  : संसार, जगत् ;  मुश्क़ : कस्तूरी, musk ; फ़क़्र : अभिमान ; सदा : पुकार ; बंदगी  : पूजा ).

इथें रदीफ, ‘है’ हा शब्द आहे. काफियासाठी वापरलेले शब्द  : भी, ली, ख़ुदाई, बंदगी.

इथें , ‘ई’ हा स्वर-काफिया आहे.

 

—  सुभाष स. नाईक  
Subhash S Naik

भ्रमणध्वनी : Mobile : 9869002126
ई-मेल : vistainfin@yahoo.co.in

 

GHAZAL AND SWAR-KAFIYA                                          –

Summary  :   Using a ‘Swar Kafiya’ ( as against a ‘pure’ Kafiya ) does not make a difference. (Swar-Kafiya is accepted in Urdu. ) . What is more important in a Ghazal   is its ‘Ghazaliyat’ , i.e. having the main characteristic for  being a Ghazal.     

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..