नवीन लेखन...

ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – २

GHAZAL AND SWAR-KAFIYA - Part 2

विभाग – २  :

आधुनिक भारतीय भाषांनी ग़ज़ल ही ‘ फारसी अथवा  दखनी_हिंदी / रेख़्ता / उर्दू / हिंदुस्तानी’ हिच्याकडून घेतली आहे , आणि त्यामुळे गज़लचे मूलभूत नियमही त्या भाषेप्रमाणेंच अन्य भाषाही पाळतात.

( टीप :  मराठीत ग़ज़ल माधव ज्यूलियन यांनी १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला आणली,  ती फारसीपासून प्रेरणा घेऊन ; तर सुरेश भटांनी १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला लिहिली ती उर्दूपासून ज्ञान घेऊन. माधवरावांनी हेतुत:, कांहीं मूळच्या नियमांचें पालन केलें नाहीं . भटांनी व्याकरणाच्या बाबतीत उर्दूचें अनुकरण केलें. असो.  )

मी , ‘स्वर-काफिया’ या विषयावर , उर्दूमधील कांहीं सुप्रसिद्ध ग़ज़लगोंच्या ‘स्वर-काफियावाल्या ग़ज़लां’च्या मत्ल्यांची कांहीं उदाहरणें  खाली देत आहे.  यांतील अनेक ग़ज़ला रसिकांनी वाचल्या    असतील, किंवा त्यांचें गायन ऐकलें असेल.


दर्द मिन्नतकशे दवा न हुआ
मैं न अच्छा हुआ, बुरा न हुआ ।

— ग़ालिब


हम रश्क को अपने भी गवारा नहीं करते
मरते है वले उनकी तमन्ना नहीं करते ।

    (वलेलेकिन )
– ग़ालिब


हर एक बात पे कहते हो कि तू क्या है
तुम्हीं कहो कि ये अन्दाज़े गुफ़्तगू क्या है ।

— ग़ालिब


देख तो दिल कि जाँ से उठता है
ये धुआँ सा कहाँ से उठता है ।

— मीर
( टीपइथें  ‘आँचा काफिया आहे. म्हणजे त्याला

स्वरकाफियाच समजायला हवें. तूर्तास जरा वेळ, बह्.,(वृत्त), मात्रा, ज़मीन, हा  विचार बाजूला ठेवू या. ‘जाँच्या ऐवजीजानअसा शब्द असता, आणि पुढचा एक काफिया, जो मुळातजहाँअसा आहे, त्याऐवजीजहानअसा असता, तर काफियाचा अंतिम वर्णहा असता, व मग ही  ग़ज़लस्वरकाफियावाली ग़ज़लझाली नसती, तीशुद्धकाफियावाली असती. पण, मुळातील  काफिये असे आहेत : जाँ, कहाँ, याँ, जहाँ, आशियाँ, नातवाँ. त्यामुळे, हीस्वरकाफियाची ग़ज़लच म्हणायला हवी ).


लाई हयात, आए ; क़ज़ा ले चली, चले
अपनी ख़ुशी न आए , न अपनी ख़ुशी चले ।

— ज़ौक़


रोया करेंगे आप भी पहरों इसी तरह
अटका कहीं जो आपका दिल भी मेरी तरह ।

— मोमिन


वो जो हम में तुम में क़रार था, तुम्हें याद हो के न याद हो
वोही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो के न याद हो ।

— मोमिन

टीप : इथें रदीफ आहेतुम्हें याद हो के न याद हो’ . आणि काफियासाठीचे शब्द आहेत,  क़रार, निबाह .


हम ही में थी ना कोई बात, याद तुमको ना आ सके
तुम ने हमको भुला दिया, हम ना तुम्हें भुला सके ।

— हफ़ीज़ जालंदरी


अपनी धुन में रहता हूँ
मैं भी तेरे जैसा हूँ  ।

— नासिर काज़मी


अँगड़ाई भी लेने न पाए उठा के हाथ
देखा जो मुझको, छोड़ दिये मुस्कुरा के हाथ  ।

— निज़ाम रामपुरी

( टीप – ‘अँगड़ाईया विषयावरील हा एक श्रेष्ठ शेर  मानला जातोही ग़ज़लस्वरकाफियावालीआहे. )


महब्बत तर्क की मैंने, गरेबाँ सी लिया मैंने
ज़माने अब तो ख़ुश हो, ज़हर ये पी लिया मैंने ।

(तर्क : परित्याग )

— साहिर लुधियानवी


मेरे हमनफ़स मेरे हमनवा मुझे दोस्त बनकर दग़ा न दे
मैं हूँ सोज़े इश्क़ से जाँबलब, मुझे ज़िंदगी की दुआ न दे ।

(हमनफ़स , हमनवामित्र, दोस्त .     सोज़जलन, तपिश जाँबलब  –  मृतप्राय, On the verge of Death )

— शकील बदायूनी

टीप : साहिर व शकील हे जरी सिनेगीतकार म्हणून ओळखले  जात असले, तरी मूलत: ते शायरच आहेत. ते नंतर सिनेसृष्टीत आले  ).


ये सारा जिस्म झुककर बोझ से दुहरा हुआ होगा
मैं सजदे में नहीं था, आपको धोखा हुआ होगा  ।

— दुश्यंत कुमार

जसा मराठीत, ‘सुरेश भट यांच्या आधीचीआणित्यांच्या नंतरची ग़ज़ल’, असा युगाचा भेद दाखवला जातो, तसेंच हिंदीतदुश्यंतपूर्वआणि ‘ दुश्यंत के बाद की ग़ज़लअसा युगभेद दाखवला जातो.  म्हणून दुश्यंत यांच्या ग़ज़लचें उदाहरण, महत्वाचें आहे ).


कांहीं मराठी ज्ञानवंत, ‘हिंदी गज़ल’ ने ग़ज़ल ची हानी केली आहे’ असें मानतात. मात्र, जशी अन्यभाषीय ग़ज़ल, जसें की मराठी ग़ज़ल किंवा  गुजराती ग़ज़ल, बंगाली ग़ज़ल, पंजाबी ग़ज़ल,  ही ‘उर्दू ग़ज़ल’ नाहीं, तर तिच्यापेक्षा भिन्न आहे ; तशीच ‘हिंदी ग़ज़ल’  सुद्धा उर्दू  ग़ज़लपेक्षा भिन्न आहे. दोघींचें व्याकरण मूलत: एकच असलें तरी .  हिंदी ग़ज़लची उर्दू ग़ज़लशी तुलना करून हिंदी ग़ज़लला कमी लेखायची आवश्यकता नाहीं. आणि तसेंही, बरेच ‘हिंदी’ ग़ज़लकार ‘हिंदुस्तानी’त लिहितात.

निष्कर्ष

वरील सर्व मत्ले  हे श्रेष्ठ शेर आहेत , व शायर हे श्रेष्ठ शायर आहेत.  त्यामुळे, वरील उदाहरणांकरून असें नक्कीच म्हणतां येईल की, काफिया हा  ‘स्वर-काफिया’ असणें यानें तसा कांहीं फरक पडत नाहीं. उर्दूत स्वर-काफिया मंज़ूर आहे. काफिया हा, स्वर-काफिया असो किंवा शुद्ध काफिया असो,  ग़ज़लियत ( म्हणजेंच ‘ग़ज़ल’ या काव्यप्रकाराच्या  खासियती त्या  विशिष्ट गझलमध्ये असणें’ )  हीच खरी महत्वाची गोष्ट .

—  सुभाष स. नाईक  
Subhash S Naik

भ्रमणध्वनी : Mobile : 9869002126
ई-मेल : vistainfin@yahoo.co.in

 

GHAZAL AND SWAR-KAFIYA

Summary  :   Using a ‘Swar Kafiya’ ( as against a ‘pure’ Kafiya ) does not make a difference. (Swar-Kafiya is accepted in Urdu. ) . What is more important in a Ghazal   is its ‘Ghazaliyat’ , i.e. having the main characteristic for  being a Ghazal.     

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..