नवीन लेखन...

मुंबईचा भाव म्‍हणजे ….गिरगांव…..

मुंबईचा भाव म्‍हणजे ….गिरगांव…..

गिरगांवच्या किवा गिरगांव चांगलं माहित असलेल्या आणि पाडगावकर माहित असलेल्या सर्वांसाठी…

गिरगांव म्हणजे गिरगांव म्हणजे गिरगांवच असतं
मुंबईतल्या सगळ्या एरियांत ते ’भाव’ खात असतं!
गिरगांव म्हणजे गिरगांव म्हणजे गिरगांवच असतं

श्रीमुंबादेवीचं हे गांव,
सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव
फडके मंदिरात विराजती श्री गणेश
नांवाजलेली शाळा-कॊलेजं
म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा गाव!
विद्यार्जन नि विद्यादानाचं
जथेे सदैव नाव असतं.
ते माझं गिरगांव, म्हणजे गिरगांव, म्हणजे गिरगांवच असतं!

राजेश खन्ना, जितेंद्र,
पराड़कर अन डावजेकर
गिरगांवचेच तर होते
गोर्यारामा समोरच्या गल्लीत
चक्क नवलकरसाहेब रहात होते!
सुलोचना ताई फणसवाडीतुन भाजी घ्यायला यायची.
नानाचौकातल्या मंदीरामधे
लताजींची रिहर्सल चालायची!
असं माझं गिरगांव, कला-संगीताचं माहेरघर असतं…
म्हणूनच गडया,
गिरगांव म्हणजे गिरगांव म्हणजे गिरगांवच असतं…

प्रकाशचा फर्मास साबुदाणावडा
नि साहित्यला ’वस्त्रहरण’
नाटक संपलं की ’अनंताश्रम’ वर,
खेकडयाचा रस्सा नि पापलेटाचं कालवण.
नाहीतर विनय वा तांबेचे गोड वरण.
गिरगांव हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं
ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..
गिरगांव म्हणजे गिरगांव म्हणजे गिरगांवच असतं…

शंकरशेट रोडला एक किलोमीटरचा पटटा असतो,
तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत
इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!
चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो
’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा मात्र निराळाच ढंग असतो!
पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी
व्हॉइस रॉय च्या खुर्चीवर मात्र
गि-हाईक हमेशा हजर असतं…
नो वंडर देन, की गिरगांव म्हणजे गिरगांव म्हणजे गिरगांवच असतं

भुलेश्वर पासून ते पार बालभवनपर्यंत,
सुखसागरच्या डोशापासून ते प्रकाशच्या पियुषपर्यंत,
लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत
व्हीपी रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!

ठाकुरद्वारचा नाका नि चोवीस तास वर्दळ,
फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ,
सदाशिवच्या गल्लीत नकळत बसतो भाभीचा धक्का,
कायानीचा ब्रुनमस्का नि सामंतांचा चक्का,
अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत
गिरगांवमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!
हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं
गिरगांव म्हणजे गिरगांव म्हणजे गिरगांवच असतं…

पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर
नि मेट्रोकडच्या मशिदीत बांगेचा सूर
इकडे साई तिकडे तिरुपति नारायण
नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण,
सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं
ते माझं गिरगांव, म्हणजे गिरगांव, म्हणजे गिरगांवच असतं.

आर्यन, चिकित्सक, राममोहन,
चंदारामजी,
टेरेसा, सेबेस्टियन, विल्सन, अैन आणी कमलाबाई
शिकणं कमी मजा करायची सर्वांना घाई.
साक्षात विद्येचे हे तर माहेरघर,
म्हणूनच म्हणतो गिरगांव, म्हणजे गिरगांव, म्हणजे गिरगांवच असतं

ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई
त्याच लोकांचं इथे घर असतं,
गिरगांव म्हणजे गिरगांव, म्हणजे गिरगांवच असतं….
मुंबईतल्या सगळ्या एरियांत ते भाव खात असतं!

WhatsApp वरुन आलेली ही कविता शेअर केलेय. कवी माहित नाही

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..