
मराठी अभिनेत्री गिरिजा ओकचा जन्म २७ डिसेंबर १९८७ रोजी झाला. हिंदी-मराठी चित्रपट तसेच मराठी मालिका आणि नाटक यातून मोजक्याच पण उत्कृष्ट भूमिका सादर करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री गिरिजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या. १५ वर्षाची असताना मोठ्या तिने पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे.
गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे. ‘लज्जा’ या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहीली मालिका होती. जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट