१५ ऑक्टोबर २००८ रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा केला गेला. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ही तारीख नियुक्ती केली होती. २००८ हे साल आंतरराष्ट्रीय स्वच्छतेचे होते. या दिनाच्या संस्थापक अशा काही संस्था होत्या, त्यांची नावं खालीलप्रमाणे :
१) एफएचआय ३६० (यूएस मध्ये असलेली विनानफा मानवी विकास संस्था)
२) रोग नियंत्रण आणि प्रतिबंध, यूएस सेंटर्स
३) युनिसेफ
४) युनिलिव्हर
५) वर्ल्ड बँक वॉटर अँड सॅनिटेशन प्रोग्रॅम
६) युनायटेड स्टेट्स एजन्सी
या दिनाचं उद्दिष्ट जास्तीतजास्त माणसांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी साबणाने हात धुवावे हे आहे. यांच्या संशोधनानुसार साधारणतः २५ ते ५०% श्वसनाचे व आतड्यासंबंधीचे रोग हे हात स्वच्छ धुतल्याने कमी होतात.
सध्याचा कोरोनाच्या काळाने तर आपल्याला हात स्वच्छ धुण्यास भाग पाडलं आहे , पण जेव्हा हा काळ निघून जाईल तेव्हा ही सवय आपण विसरता कामा नये. अखेरीस एक म्हणता येईल की , ” सिर सलामत तो पगडी पचास. ”
— आदित्य दि. संभूस
#Global Handwashing Day
Leave a Reply