प्रश्नः- ग्लोबलायझेशन म्हणजे नक्की काय?
उत्तरः- प्रिन्सेस डायनाचा मृत्यु!
प्रश्नः- काहीतरीच काय? प्रिन्सेस डायनाच्या मृत्युचा व ग्लोबलायझेशनचा काय संबंध?
उत्तरः- त्याचे असे आहे! एक ‘ब्रिटिश’ प्रिन्सेस तिच्या ‘इजिप्तशियन’ बॉय फ्रेन्डबरोबर ‘जर्मन’ कार मधून जात असताना ती कार एका ‘फ्रेन्च’ टनेलमध्ये क्रॅश झाली. त्या गाडीला ‘डच’ इंजिन होते. त्या गाडीच्या ‘बेल्जियम’ ड्रायव्हरने ‘स्कॉटलन्ड’ मध्ये तयार झालेली स्कॉच व्हिस्की ढोसली होती. त्या प्रिन्सेच्या मागे लागलेली ‘इटालियन’ पॅरॅपेझी पत्रकार तिचा ‘जपानी’ मोटर सायकलवर पाठलाग करत होते. तिला अपघात झाल्यावर एका ‘अमेरिकन’ डॉक्टरने तिच्यावर उपचार केले व यासाठी ‘ब्राझील’ मध्ये तयार केलेली औषधे वापरली. ही गोष्ट एका ‘इंडियन’ ने ‘अमेरेकन’ टेक्नॉलॉजी वापरून तुमच्यापर्यंत पोचवली. आता ही गोष्ट आपण आपल्या आय फोन, ऍन्डॉईड, विन्डोज सारख्या ‘अमेरिकन’ टेक्नॉलॉजी असलेल्या उपकरणांवर वाचणार असाल तर लक्षात ठेवा की याच्या मायक्रोचिप्स ‘तैवान’मध्ये तयार होतात तर स्क्रिन ‘कोरिया’ मध्ये तयार होतो. तुमचा फोन कदाचीत एखाद्या ‘बंगलादेशी’ कामगाराने ‘सिंगापुर’ मधील फॅक्टरीत तयार केला असेल व एखाद्या ‘पाकिस्तानी’ ट्रक ड्रायव्हरने त्याची वाहतूक केली असेल.
प्रिन्सेस डायनाचा मृत्यु, ही खबर तुमच्यापर्यंत पोचवणे व तुम्ही ती तुमच्या आय फोन, स्मार्ट फोन, टॅबलेट, लॅपटॉप किंवा पीसी वर वाचणे या प्रक्रियेत ब्रिटन, इजिप्त, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, हॉलन्ड, स्कॉटलन्ड, इटाली, जपान, अमेरिका, ब्राझील, इंडिया, तैवान, कोरिया, बंगलादेश, सिंगापुर, पाकिस्तान अशा 17 देशांचे योगदान आहे.
याला म्हणतात ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण.
–उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
Leave a Reply