नवीन लेखन...

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे.

गोव्यात विन्सन वर्ल्ड ही कार्यक्रम आयोजनातील नावाजलेली संस्था. या संस्थेचे सर्वेसर्वा संजय शेट्ये आणि विनोद शेट्ये या बंधुंनी आपल्या कल्पक नजरेतून गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची योजना आखली. त्यानुसार 2008 साली पहिलाच चित्रपट महोत्सव झाला. या महोत्सवाची सुरूवात ख्यातनाम फिल्ममेकर अमोल पालेकर यांच्या “थांग” या चित्रपटाने झाली. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “वळ”ू हा उमेश कुलकर्णी यांचा चित्रपटही या महोत्सवात दाखविण्यात आला होता. काही मोजकेच चित्रपट घेऊन सुरू झालेल्या या महोत्सवाने आज बरीच उंची गाठली आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सिने सृष्टीतील तारे तारका गोव्यात येतात. रसिकांनाही आपल्या चाहत्या कलाकारांना जवळून पाहण्याची, भेटण्याची संधी लाभते. गोवा मराठी चित्रपट महोत्सव आता गोव्याची शान बनला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. यंदाचा बारावा महोत्सव निश्चितच खास असणार आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण असते ते म्हणजे, यात प्रिमीयर शोज दाखविले जातात. नवीन चित्रपटांची घोषणा केली जाते. चर्चासत्रे, परीषदा, परीसंवाद होतातच. त्याहीपेक्षा रसिक प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिली जाते. आणि सर्वात मुख्य म्हणजे मराठी सिने सृष्टीतल दिग्गज कलाकारांच्या हस्ते, तारे तारकांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन केले जाते. महोत्सवातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, संस्थेच्या वतीने ज्येष्ठ कलाकाराला दिला जाणारा कृतज्ञता पुरस्कार. आत्तापर्यंत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, आशालता वाबगावकर, रमेश देव आणि सीमा देव, वर्षा उसगांवकर, कोकणी म्युझीकमधली आंतरराष्ट्रीय गायिका लॉर्ना यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यंदाचा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सुमित्रा भावे या महोत्सवाच्या सुरूवातीच्या काळापासून गोव्यात येतात. त्यांच्या चित्रपटांना गोवेकर वाखाणतात. चर्चासत्रांमध्ये तर त्यांचा सहभाग असतोच. तर असा हा गोवेकरांचा दर्जेदार असा गोवा चित्रपट यंदा 28 पासून सुरू होणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्सतर्फे निर्मित पहिल्याच विजेता या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन महोत्सवात होणार आहे.घई यांच्या मुक्ता आर्ट्स तर्फे पहिलाच मराठी सिनेमा बनवण्यात आला असून त्याचे प्रदर्शन घई यांच्या इच्छेनुसार महोत्सवात केले जाणार असल्याची माहिती, महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी दिली.

याशिवाय 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात मुळशी पॅटर्न (दिग्दर्शक प्रवीण तर्डे), बस्ता (दिग्दर्शक तानाजी धाडगे), होडी (दिग्दर्शक गजेंद्र अहीरे), नाळ (दिग्दर्शक सुधाकर रेड्डी), वेडिंग चा सिनेमा (दिग्दर्शक सलिल कुलकर्णी),  कागार(दिग्दर्शक मकरंद माने), सुर सपाटा (दिग्दर्शक मंगेश काथाकाळे), भोंगा (दिग्दर्शक शिवाजी पाटील), दिठी (दिग्दर्शक सुमित्रा भावे), इमेगो (दिग्दर्शक करण चव्हाण), खटला बिटला (दिग्दर्शक परेश मोकाशी), म्होरक्या (अमर देवकर), मिरांडा हाउस (दिग्दर्शक राजेंद्र तालक), पाणी (दिग्दर्शक आदिनाथ कोठारे), चुंबक (दिग्दर्शक संदीप मोदी), आरोन (दिग्दर्शक ओमकार शेट्टी), अहिल्या (दिग्दर्शक राजू पार्सेकर) आदी सिनेमांची मेजवानी मराठी चित्रपट प्रेमींना चाखता येणार आहे.

यावेळी चार लघुपट देखील महोत्सवात दाखवले जाणार आहेत. यामध्ये पाम्फलेट (दिग्दर्शक शेखर रणखांबे), पोस्टपार्टुम (दिग्दर्शक विनोद कांबळे), गोधुळ (दिग्दर्शक गणेश शेलार) आणि आई शप्पथ (दिग्दर्शक गौतम वझे) यांचा समावेश आहे.

12 व्या गोमचिममध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे कलाकार,दिग्दर्शक,निर्माते, तंत्रज्ञ हजेरी लावणार आहेत. आता पर्यंत पार पडलेल्या 11 गोवा मराठी चित्रपट महोत्सवांना विक्रम गोखले, अमोल पालेकर,सचिन पिळगावकर,नाना पाटेकर,मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महेश मांजरेकर,रवी जाधव,सचिन खेडेकर,वर्षा उसगावकर यांच्या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावलेली आहे. यंदा कला अकादमी बरोबरच आइनॉक्स,मॅकेनिझ पॅलेस 1 आणि 2 तसेच वास्को येथील 1930 या सिनेमागृहांमध्ये सिनेमांचे प्रदर्शन होणार आहे.

महोत्सवासाठी नोंदणी पुढच्या आठवडयात पणजी, म्हापसा,फोंडा,मडगाव आणि वास्को बरोबरच बुक माय शो डॉट कॉमवर सुरु होणार आहे.

— कालिका बापट 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..