गोव्यावर आदिलशाही राज्य होते. पोर्तुगीज समुद्रमार्गे सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकात गोव्यात आले. त्यांनी १५१० मध्ये यूसुफ आदिल शाह याचा पराभव करुन वेल्हामध्ये पहिली वसाहत स्थापन केली. अल्पावधीत त्यांनी पूर्ण गोव्यावर अंमल बसवला. तब्बल ४५० वर्षे पोर्तुगिजांची सत्ता गोव्यावर होती.
इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात.
आजच्या या खास दिवसानिमित्त गोवेकरांना गोवा राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply