“…’देवावर श्रद्धा असावी” हे जवळजवळ सर्वच ध्रम-पंथं सांगत आले आहेत. मला मात्र देवाचे एकूण वागणे आमच्या आजच्या राज्यकर्त्यांसारखे वाटत आले आहे. देव दीनांचा वाली आहे आणि संकटकाली तो भक्तांच्या मदतीला धावून जातो ह्याचे पुरावे पौराणिक ललित वाड्मयाखेरीज मला कुठे सापडतंच नाहीत. तसंच राज्यकर्ते गरीबांच्या मदतीला धावून गेलेयत ह्याची वर्णनं फक्त पक्षाच्या मुखपत्रातच वाचायला मिळतात, प्रत्यक्षात बघायला मिळत नाही..
देवाप्रमाणेच राज्यकर्त्यानीही मला फसवले आहे याची मला आता खात्री पटली आहे..!!”
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांनी १९७४ साली लिहीलेल्या ‘एक शुन्य मी’ या लेखातली ही काही वाक्य. आज देखील परिस्थिती फार बदललेली नाही हेच यातून अधोरेखित होतं..!
Leave a Reply