नवीन लेखन...

गोदावरी

परंपरेकडे नेणारी...

‘अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास’… चित्रपटाचं उपशीर्षक एक प्रकारची हमी, सकारात्मकता देऊन जातं …आमच्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना ‘and they lived happily ever after’ ची इतकी सवय आहे कि सिनेमा म्हटलं कि पहिल्यांदाच ‘शेवट गोड होतोय ना ‘ या कडे लक्ष लागून राहतं. ..आणि ते , ‘गोदावरी’ हा चित्रपट पूर्ण करतो..

गोदातिराची दृश्य हि या चित्रपटाचा ‘USP’ आहे. सुरुवातीपासून शेवट पर्यंत पात्रांच्या आयुष्यातल्या समस्या किंवा उतार चढाव दाखवले असले तरी ‘गोदामाई’ सतत आशावाद दाखवत राहते.

निशिकांत चा स्वतःचा स्वतःशी सुरु असलेला संघर्ष अधोरेखित तर होत राहतोच पण चित्रपटात त्याचं डबकं होऊ दिलेलं नाही. परंपरा म्हणजे ‘ प्रवाह ‘…नदीसारखा…जशी नदी थांबत नाही तशी परंपराही..त्यात फक्त जाणिवांची भर पडत राहते…मात्र आपण परंपरेला देणं लागतो…आणि त्यात काहीही गैर नाही ..अशी एक एक उत्तरं निशिकांत ला सापडत जातात.

चित्रपटाची इतर पात्र हि जणू निशिकांत च्या गुरुची भूमिका बजावतात. त्याचे आई-वडील, पत्नी गौतमी, मुलगी सरिता, मित्र केशव, फुगेवाला आणि सरते शेवटी त्याला भेटलेला साधू …प्रत्येकाशी त्याचा झालेला संवाद हा निशिकांत ला पुन्हा एकदा त्याचा स्वतःशीच परिचय करून देतो…

आपल्या संस्कृतीशी व परंपरेशी आपण कळत नकळतपणे इतके जोडले गेलेले असतो की त्यापासून आपण सवतःला वेगळं काढू शकत नाही…आईच्या गर्भात असल्या पासून गोदावरीच्या किनारी राहिलेल्या, वाढलेल्या निशिकांतची सर्वात मोठी गुरू ही तीच ‘गोदावरी’ आहे याचा उलगडा त्याला होत जातो. आयुष्याचा शेवटचा टप्पा जगत असलेला निशिकांत , त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या पिंज-यातून स्वतःला मुक्त करतो…

दिग्दर्शक निखिल महाजन यांनी प्रसंगानुरूप वापरलेली cinematic language,जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने ,विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर या सर्व कलाकारांचा अभ्यासपूर्ण अभिनय , प्रफुल्लचंद्र यांचं संगीत, शमीम कुलकर्णी यांची cinematography हे सगळेच घटक चित्रपट उत्तम रीत्या उलगडतात…

आपला स्वतःशीच चाललेला संघर्ष सोडवणयाकरता, तो आपणंच निर्माण केलाय हे आधी आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे.

‘गोदावरी’ सारखे चित्रपट spoon feeding करत नाहीत, मात्र विचार करण्याची इच्छा असणा-यांना विचार करायला नक्की लावतात..

बाकी प्रेक्षक ‘चित्रपट समजला नाही’ म्हणतात…आपल्याला कुठल्या प्रकार चा प्रेक्षक व्हायचंय हे आपण ठरवायचं…नाही का?

Photo credits: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..