हे, सुमन निरागस, लोचनी सुंदरा कौमुदी
आठविते सांजवेळी, ती वृंदावनीची गोधुली ।।१।।
झुकलेले निलांबर, ती लाजलेली वसुंधरा
चराचर ! शृंगारलेले, सांजरंगलेली गोधुली ।।२।।
जाहली तिन्हीसांजा, तेजाळलेले दीप द्वारी
तीव्र ओढ जिताबरांची, उधळलेली गोधुली ।।३।।
गोपगोपिका गोपाळ, गोकुळीचा गिरीधारी
गोरज गोरस गोवर्धन, माखलेले सारे गोधुली ।।४।।
धून मंजुळ पावरीची, मंत्रमुग्धली राधा बावरी
सांज निळीसावळी, साक्ष ब्रह्मानंदी गोधुली ।।५।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १००.
४ – ८ – २०२१.
Leave a Reply