नवीन लेखन...

कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांची जादु ……

Gold Forming Jewellery in low cost

श्रावण महिना लवकरच सुरु होईल. सणासुदीच्या या दिवसात सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघानेच आले. मुंबई-पुण्यातल्या असुरक्षित जीवनात खर्‍या सोन्याचे दागिने घालून प्रवास करणेही कठीण झाले आहे. सोन्याच्या किमतीही आता आकाशाला भिडायला लागल्या आहेत. त्यामुळे अस्सल सोन्याचे दागिने घालण्यावर मर्यादा आल्या आहेत.

बदलत्या काळाची गरज ठरलेले, कलाकुसर, नावीन्य, सुरक्षितता, हौस आणि कमी वजनातील २४ कॅरेट सोन्याचे फॉर्मिंग दागिने महिलावर्गात विशेष प्रिय ठरले आहेत.

एक काळ असा होता की, विवाहानंतर सौभाग्य लेणं म्हणून ठसठशीत मोठं मंगळसूत्र, चार सोन्याच्या बांगड्या-पाटल्या, कानातील वजनदार झुमके वगैरे घालणार्‍या स्त्रिया सर्रासपणे दिसायच्या. किंबहूना असे दागिने घालून मिरवणार्‍या स्त्रिया “घरंदाज” समजल्या जायच्या. आजही टिव्ही मालिकांमध्ये जुन्या काळातल्या स्त्रिया भरगच्च आणि भारदस्त दागिने गालून मिरवताना दिसतात.

जसा काळ बदलला. महिलांना शिक्षणाची पुरेशी संधी उपलब्ध झाली, आणि त्यांनीही विविध क्षेत्रे पादाक्रांत करायला सुरुवात केली. महिला नोकरी – व्यवसायात आगेकुच करु लागल्या. त्यांच्या हातात स्वकमाईचा पैसा शिल्लक राहु लागला. परंतू सोन्याच्या दागिन्यांची भारी उपजत हौस असली तरी ही जोखीम अंगावर बाळगणं त्यांना धोक्याचं वाटु लागलं. मग खोट्या दागिन्यांचे… सोन्याचा मुलामा दिलेले दागिन्यांचे दिवस सुरु झाले. मात्र हे खोटे दागिने फार काळ टिकत नसत. ते खोटे आहेत हेसुद्धा जाणकाराच्या पटकन लक्षात येई.

नव्या तंत्रज्ञानाने जसं सगळं जग व्यापुन टाकलं तसं हे दागदागिन्यांचं क्षेत्रही व्यापायला सुरुवात केली. १ ग्रॅम सोन्यातल्या दागिन्यांची सद्दी सुरु झाली. दिसायला ठसठशीत पण वजनाला आणि खिशाला हलके असलेल्या या दागिन्यांवर महिलामंडळ खुष झालं आणि बघताबघता हा उद्योग मोठी भरारी घेऊ लागला.

senoritas-raani-haar-601कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांचे नाजुक कलाकुसर असलेले असंख्य नमुने तयार होऊ लागले. या दागिन्यांच्या जादूने महिलावर्गाला संमोहीत केलं नसतं तरच नवल. लग्न समारंभासारख्या प्रसंगी एकच मोठा दागिना वापरण्यापेक्षा तेवढ्याच सोन्यात शुद्ध सोन्याच्या कसाचे चार-पाच नावीन्यपूर्ण दागिने वापरणं ही कल्पना महिलांना अतिशय आवडली. खिशाला परवडतील अशा थोडक्या पैशात, नवनवीन नाजूक कलाकुसरीचे दागिने मिळु लागल्यामुळे मोलकरणीपासून ते उच्चभ्रु वर्गातील महिलांपर्यंत सर्वांनीच त्यांचं स्वागत केलं. वर्ष-दोन वर्ष पैसे साठवून एखादा दागिना पदरात पडण्यापेक्षा दर दोन – चार महिन्याने एक नवीन दागिना घरी आणणं महिलांना अधिक सोईचं ठरु लागलं.

कमी वजनातील हे दागिने पूर्ण तांब्याचे बनवलेले असतात. त्यावर इलेक्ट्रो फॉर्मिंग मशिनने सोन्याचा एक मायक्रॉनचा म्हणजे अत्यंत सुक्ष्म अशा सुवर्णकणांचा थर दिला जातो. पूर्ण नियंत्रणाकाली दिलेल्या स्प्रेमुळे हा थर एक सारखा व पक्का बसतो.

शुद्ध सोन्यात घडविलेले दागिने कधीही चेपतात किंवा वाकतात. मात्र या फॉर्मिंग दागिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तांब्यावरचे असल्याने जास्त दणकट व टिकाऊ असतात. त्यामुळे त्यांच्या दबले जाण्याची किंवा वाकण्याची अजिबात भिती नसते. रोजच्या वापराने त्यांची थोडीफार झीज होते. या दागिन्यांवरच सुवर्णकणांचा पातळ मुलामा दिला असल्याने फार जोरात व सातत्याने ते दगड, फरशी, लाकूड वगैरेसारख्या कठीण पृष्ठभागावर घासले गेले तरच त्यावर चरे उमटण्याची शक्यता असते. शुद्ध सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे या दागिन्यांवरही घाम, अॅसिड, सौंदर्यप्रसाधने वगैरेंचा परिणाम होतो. मात्र गरम पाण्याचा या दागिन्यांवर काहीही परिणाम होत नाही.

senoritas-logoलक्षवेधी असे हे कमी वजनातील फॉर्मिंगचे दागिने आता बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंडसखाली उपलब्ध झाले आहेत.

अस्सल मराठी म्हणता येईल अशा “सेनोरिटा” ब्रॅंडने अस्सल मराठमोळी रेंज कमी वजनात आणली आहे. अगदी पेशवाई थाटाचे दागिनेसुद्धा उपलब्ध आहेत आणि तेसुद्धा अतिशय कमी किंमतीत. फॉर्मिंग दागिन्यांमध्ये मंगळसुत्र, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, कर्णफुले, पायल, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या वगैरे सर्वकाही भरपुर डिझाईन्समध्ये आणि ते ही आपल्या बजेटमध्ये म्हणेच रु. ४९९ ते रु. ३९९९ पर्यंत उपलब्ध आहेत.

“स्वर्ग” या आणखी एका नावाजलेल्या ब्रॅंडनेही हे कमी वजनातील फॉर्मिंग दागिने बाजारात आणले आहेत.

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..