गोळवलकर गुरुजी यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६ रोजी रामटेक येथे झाला.
माधव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली.
श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील जनकल्याण समितीतर्फे गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध क्षेत्रातील व्यक्तींना ’परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार’ दिले जातात.
गोळवलकर गुरुजी यांचे निधन ५ जून १९७३ रोजी झाले. आपल्या समूहाकडून गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply