या तलावाच्या परिसरात विलक्षण शांत निसर्ग पसरलेला आहे. तेथे या तलावाबाबत काही गूढ आख्यायिका आहेत. पूर्वी येथील देवीला प्रार्थना केली की एखाद्या गरीब मुलीच्या विवाहासाठी, तलावातून दागिन्यांची परडी वर येत असे. लग्न झाले की हे दागिने परडीत भरून पुन्हा तळ्यात सोडून दिले जात. पण कुणालातरी दागिने परत न करण्याचा मोह झाला आणि नंतर हे दागिने येणे थांबले. दुसरे असे ऐकायला मिळाले की या तलावाला तळच नाही. तलावातील पाण्यात तुम्ही कितीही खाली गेलात तरी तळ सापडत नाही. इथे प्रसादासाठी जेवण आणले असेल तर ते येथेच संपवायचे किंवा वाटून टाकायचे पण घरी परत न्यायचे नाही. या श्रद्धा की अंधश्रद्धा याची तपासणी करण्याचे माझे काम नसल्याने मी हा सर्व सुंदर परिसर फिरून छान आनंद घेतला. भगवती देवीचे साधे पण प्रशस्त मंदिर आणि परिसर मुक्त निसर्ग सौन्दर्याचे एक कोकण लेणे आहे !
— मकरंद करंदीकर.
Leave a Reply