
काही शब्द असे असतात की जे उच्चारताच हमखास कशाची तरी आठवण येते. काही ब्रॅंडस आपल्या डोक्यात इतके फिट्ट बसलेले असतात की त्यांच्या लोगोची अक्षरं जरी दिसली तरीही आपण पुढचं न वाचता त्या वस्तूची खरेदी करतो. यामुळेच बाजारात अनेक नामांकित ब्रॅंडसच्या वस्तूंच्या नकली मालाची मोठी बाजारपेठ तयार झालेय.
कधीकधी अक्षरांची फिरवाफिरव तर कधी स्पेलिंगमधला बदल… नकली माल बनवणारे कशाचाही आधार घेतात.
बर्फाचा थंडगार गोळा विकणार्या फोटोतल्या या विक्रेत्याने मात्र कोणताही नकली माल विकण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र त्याने “गुगल”ची लोकप्रियता बघून त्याच्या गाडीवर असा काही बोर्ड लावलाय की गिर्हाईकाचे लक्ष हमखास त्याच्याकडे गेलेच पाहिजे. त्याने नुसती अक्षरांची फिरवाफिरवच नाही केली… तर “गुगल”चं होम पेजच आपल्या बोर्डवर प्रिंट करुन घेतलंय.
ही आहे भारतीय क्रियेटिव्हिटीची कमाल !!
मस्त !
छानच…. ब्रॅंडच्या लोकप्रियतेचा अचूक वापर केलेला आहे