आज 22 मे , बरोबर एक वर्षांपूर्वी पहिले रेडिओ जॉकी गोपाळ शर्मा यांचे निधन झाले, नेट वर 24 तारीख आहे, असो.. ज्यांनी ‘ शुभरात्री ‘ हा शब्द आम्हाला दिला.
‘आवाज की दुनिया के दोस्तो’ चे गोपाल शर्मा यांचे निधन.
‘आवाज कि दुनिया के दोस्तो’…हा आवाज आमच्या पिढीने रेडिओ सिलोन वर अनेक वेळा ऐकला आहे तो आवाज. डोंबिवलीचे रेकॉर्ड संग्राहक अजित प्रधान यांचा निरोप आला की गोपाल शर्मा यांचे बोरिवलीत निधन झाले, मग अजितजी यांनी गोपाल शर्मा यांच्या मुलाला फोन करून माहिती घेतली होती .
गोपाळ शर्मा यांचा जन्म १९३१ मध्ये झाला.
अजित प्रधान यांच्या घरी डोबिवलीत गोपाल शर्मा येत असत. अजित प्रधान यांच्या पुस्तकाचे जेव्हा प्रकाशन झाले ते ओ . पी. नय्यर यांच्या हस्ते तर त्याचे तेव्हा सूत्र संचालन केले होते गोपाल शर्मा यांनी.
मला गोपालजींना अनेक वेळा कार्यक्रमात भेटण्याचा योग आला होता . तसेच अभिनेत्री सुरैया हिचे निधन झाल्यावर ते मला चर्नीरोडच्या ‘ बडा कब्रस्तान’ मध्ये भेटले होते. त्यानंतर जेव्हा ओ .पी. नैय्यर यांचे निधन झाले तेव्हाही त्यांची भेट झाली होती. ते त्यांच्या घरी ठाण्यात आले होते.
गोपाल शर्मा हे सतत पाच पाच तास षण्मुखानंदला कार्यक्रमाचे संचालन करत असत , दोन गाण्यामध्ये त्यांचा आवाज ऐकणे ही पर्वणीच होती. त्या काळात शील कुमार, मनोहर महाजन, अमीन सायानी , दलवीर सिंग या मंडळींचा रेडिओ जगतावर खूप दबदबा होता.
ज्यांनी हिंदी रेडिओच्या जगताला ‘ गुड नाईट ‘ च्या ऐवजी ‘ शुभ रात्री ‘ हा शब्द दिला ते गोपाल शर्मा आज आपल्यातून निघून गेले आहेत
— सतीश चाफेकर.
Leave a Reply