गोट्या सावंत यांचा जन्म ५ एप्रिल १९५४ रोजी झाला.
नाट्य क्षेत्र जवळपास ४०-५० वर्षे पाहिल्यावर स्वत: निर्मिती क्षेत्रात उतरलेले गोट्या सावंत. नाट्यनिर्मितीमधील नफ्या-तोट्याचा विचार न करता फक्त आवड म्हणून किंवा ऋण फेडण्यासाठी या मंडळींनी नाटकाची निर्मिती केली आहे. प्रभाकर सावंत हे गोट्या सावंत यांचे नाव,पण नाट्यवर्तुळात त्यांना गोट्या सावंत या नावाने ओळखले जाते. जवळपास १९७० सालापासून नाटकाशी संबंधित असलेली व्यक्ती म्हणजे गोट्या सावंत.
नेपथ्य, कपडेपट, प्रकाशयोजना, संगीत, लेखन, अभिनय, नाट्य कंपनीचे सूत्रधार ते नाट्यनिर्माता या साऱ्या आघाड्यांवर गोट्या सावंत यांनी काम केलं आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकापासून सावंत यांनी सूत्रधाराची भूमिका वठवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडे रंगनिल, तृप्ती, जगदंबा, स्वरा मंच, सिने मंत्र, त्रिकुट, जॉय कलामंच, विन्सन अशा काही निर्मिती संस्थाच्या साठी काम केले आहे. एका नाटकात तोटा झाल्यामुळे त्यांना घरही विकावं लागलं होतं. हे क्षेत्र सोडून ते बायकोच्या घरी पुण्याला राहायला गेले. त्यानंतर मुंबईत येऊन एक छोटेखानी व्यवसाय सुरू केला. त्या वेळी प्रभाकर पणशीकर त्यांना शोधत आले आणि पुन्हा नाट्यक्षेत्रात त्यांचं पुनरागमन झालं.
१९७० साली गोट्या सावंत हे ‘कलावैभव’ या नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक होते. आठ वर्षे हे काम केल्यावर त्यांनी ‘तोची वासू ओळखावा’ या नाटकाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी १९८२ साली रत्नाकर मतकरी यांचं ‘स्पर्श अमृताचा’ या नाटकाची निर्मिती केली. या नाटकामुळे त्यांना प्रचंड तोटा झाला. तो भरून काढण्यासाठी त्यांना वांद्रे येथील घर विकावं लागलं. त्यानंतर ते पुण्याला राहायला गेले. अर्थार्जनाचं साधन नव्हतं. पुढे काही वर्षांनी मुंबईत गोरेगावला एक व्यवसाय सुरू केला. काही दिवसांनी पंत पणशीकरांनी त्यांना नाट्यक्षेत्रात परत आणले. ‘नाटकाचा सूत्रधार असणे, फार जिकिरीचे आहे. कारण निर्मात्याचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास असावा लागतो. तुम्ही जो काही निर्णय घेता त्याचा परिणाम नाटकासहित आर्थिक गणितांवर होणार असतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलावे लागते. पैसे कमी करण्याबरोबर एखादा प्रयोग रद्द करण्याचा अधिकारही सूत्रधाराकडे असतात,’ असे सावंत एका मुलाखतीत सांगितले आहे.
गोट्या सावंत यांनी मराठी नाट्य व्यस्थापक संघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या ते संस्कृती कला दर्पणच्या संचालक मंडळावरही काम करत आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply