आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणतात. यालाच ‘वसुबारस ‘ असे नांव आहे.
समुद्रमंथनातून पाच कामधेनू निर्माण झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स धेनूचे पूजन करतात. तिची प्रार्थना करतात. हे सर्वात्मिके आणि सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझी मनोकामना सफल कर. गोडधोड करून तिला खाऊ घालतात.
उत्तर भारतात या व्रताला वछवाँछ असे म्हणतात.
Leave a Reply