गोविंदा यांचे खरे नाव गोविंदा अरुण आहूजा आहे. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९६३ रोजी झाला. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये त्यांना गोविंदा या नावाने लोकप्रियता मिळाली.
गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. नव्वद च्या दशकात गोविंदा जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जात होता तितकाच तो त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध होता. गोविंदाच्या डान्सचे आजही अनेक चाहते आहेत. गोविंदाने जवळजवळ सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले. मात्र गोविंदाला नीलमसोबत काम करायला अधिक आवडायचे.
गोविंदाला तिच्याशी लग्नही करायचे होते. मात्र त्यांची ही जोडी केवळ रील लाईफपुरतीच मर्यादित राहिली. गोविंदाने १९८६मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. इल्जाम हा त्याने केलेला पहिला चित्रपट. हा चित्रपट त्या वर्षातील पाचवा सुपरहिट सिनेमा होता. या चित्रपटाच गोविंदाची हिरोईन म्हणून नीलमने काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि पाहता पाहता ही जोडी हिट झाली. लोकांनी या जोडीला डोक्यावर घेतल्यानंतर अनेक चित्रपटाच्या ऑफर्स यांना आल्या.
विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे. गोविंदाचा अभिनय, विनोदाचे टायमिंग, संवादफेक एवढेच नाही तर खास गोविंदा स्टाईल नृत्य आजही अफलातून आहे. गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. अभिनेता गोविंदा यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव नर्मदा आहे. तिने किशोर नमित कपूर इन्स्टिट्यूटमधून अभिनय क्षेत्राचा कोर्स केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply