गोव्यात गणेश चतुर्थीला दोन दिवस सरकारी सुटी असते. शाळांना पाच दिवस सुटी असते. शाळेनाही दोनच दिवस सुटी होती पण विद्यार्थी गैरहजर असायचे म्हणून शाळेंना पाच दिवस गणेश सुटी देण भाग पडलं.
परंपरा पाळणारी कुटूंबे जावयाला अजूनही ओझ पाठवितात. मोठी नेवरी/करंजी, लाडू, चकली, केळ्याचा हलवा हे पदार्थ ओझात हमखास असत. पुर्वी मोठ्या पाटल्यातून हे ओझे गडी डोक्यावरून वाहून परगावी मुलीकडे जाऊन पोहचवित असे. आता भुर्रकन गाडी येत व ओझ पोहोचवून जाते. नवी नवरी माहेरून आलेल ओझ दिमाखान शेजारी पाजारी वाटते.
पोर्तूगिज रिपब्लिक १९१० मधे झाले. त्या वर्षा पासून गोव्यात मोकळेपणी हिंदू सण सार्वजनिकरीत्या धुमधडाक्यात सुरू झाले. ततपुर्वी घरातील कोनाड्यात गणपतीचे चित्र लावून हळू आवाजात पुजा-आरती करायचे. दिवाळीला नरकचतुर्थीला नरकासूर दहन सुरू झाल. आताचे बहुतांश सार्वजनिक गणपती गोवा स्वातंत्रानंतर सुरू झालेले आहेत. घरोघरी गणपतीसमोर देखावा करणे मधल्या काळात जोमात चालल होत.
पंधरा लाख गोव्यात ७५ हजार गोवेकर सरकारी नोकर आहेत. म्हणजेच वीस पैकी एक सरकारी नोकर. (हे प्रमाण फारच जास्त आहे .) त्यामुळे सुटी असल्यामुळे सरकारी नोकर चतुर्थीला गावी जातात व पणजी सारखे शहर चतुर्थीला ओस पडते. गाव मात्र चतुर्थीला गजबजतात. धुमधडाक्यात प्रत्तेक घरी दुपारी व रात्री आरती होते. गोव्या चतुर्थीला मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस गणपती विसर्जन काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतशबजी होते.
श्रीकांत बर्वे
Leave a Reply