नोकरीनिमित्त अनेक चाकरमानी आपले गाव सोडून मुंबई-पुण्यात किंवा अगदी परदेशातही स्थायिक झालेले असले तरी त्यांचे मन मात्र गावात गुंतलेले असतेच. आपल्या गावाच्या काही आठवणी, फोटो, उत्सव यांची आठवण आपल्याला नेहमीच येते.
प्रत्येक गावाची एकग्रामदेवता किंवा ग्रामदैवत असते. दिवसातून अनेकदा, अभावितपणे आपण आपल्या ग्रामदेवतेची आठवण काढत असतो. कठीण समयी ग्रामदेवतेचा धावाही करत असतो. पैशाच्या मागे धावणार्या आपल्यापैकी प्रत्येकाच्या पाकिटात ’ग्रामदेवते’चा फोटो असतो.
आता आपण आपल्या ग्रामदेवतेची माहिती अणि फोटो मराठीसृष्टीच्या माध्यमातून जगभरात विखुरलेल्या मराठीजनांपर्यंत पोहोचवू शकतो “माझी ग्रामदेवता” या सदराद्वारे.
ग्रामदेवतेची माहिती आणि फोटो पाठविण्यासाठी येथे Email करा…
Leave a Reply