फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing the palm (मस्का लावणे) अशा अर्थाची एक इंग्रजी म्हणदेखील आहे. ग्रीज हे पेट्रोलियम बेस ऑइल (प्राथमिक स्वरूपाचे, निर्वात उर्ध्वपातनानेn मिळालेले वंगणतेल) आणि विविध प्रकारचे साबण यांचे मिश्रण होय. हे साबण गरजेनुसार कॅल्शियम, लिथियम, सोडियम, बेरियम, ॲल्युमिनियम, टिटेनियम या धातूंपासून बनविलेले असतात. काही ग्रीजेसमध्ये बेंटोनची माती, सिलिका, पॉलीयुरिया यांसारखे पदार्थ ‘थिकनर’ म्हणून वापरतात. काही ग्रीजेसमध्ये आवश्यकतेनुसार रासायनिक पुरकेदेखील मिसळली जातात.
या ग्रीजमध्ये द्रव्यमाध्यम म्हणून प्रामुख्याने पॅराफिनिक किंवा नॅफ्थानिक स्वरूपाच्या पेट्रोलियम तेलांसोबतच वनस्पती तेले आणि सिंथेटिक तेलेसुद्धा वापरली जातात. याशिवाय, विविध प्रकारच्या ग्रीजेसमध्ये अँटी ऑक्सिडंट, एक्स्ट्रिम प्रेशर, अँटीरस्ट, पोर पॉइंट डिप्रेसंट, व्ही. आय. इंप्रूवर इत्यादी रासायनिक पुरके मिसळतात.
एखादे ग्रीज किती कठीण वा मृदू आहे हे त्याच्या दृढता-कसोटी (कन्सिस्टंसी) वरून अजमावले जाते. त्यासाठी ग्रीजचा भेदन बिंदू (पेनेट्रेशन पॉइंट) तपासावा लागतो. भेदन बिंदू ठरविण्यासाठी २५ अंश सेल्सिअस तापमानाला पेनेट्रोमीटरमधून सोडलेली सुई किंवा शंकू ५ सेकंदात ग्रीजमध्ये किती.. खोलीपर्यंत आत घुसते हे मोजले जाते….गतीने फिरणाऱ्या यंत्रात मृदू ग्रीज वापरावे कड लागते तर-संथ गतीच्या यंत्रसामग्रीसाठी कठीण ग्रीज, लागते. खूपच मऊ असलेल्या ग्रीजची भेद्यक्षमता ४४५-४७५ असते तर कठीण. ग्रीज ४०-७० भेद्यक्षमतेचे असते. ज्या. तापमानाला ग्रीजमधले वंगणतेल साबणापासून वेगळे होते त्यास ‘अलग-बिंदू’ (ड्रॉप पॉइंट) म्हणतात. उच्च तापमानाला कार्यरत असणाऱ्या यंत्रणेसाठी उच्च अलग-बिंदू असलेले ग्रीज वापरावे लागते. घर्षण व यंत्रभागांची नासधूस रोखणे, गंजण्यापासून रक्षण, कचरा, पाणी, धूळ या बाह्य घटकांपासून बेअरिंग्जचे रक्षण, वंगणाची गळती होऊ न देणे. तापमानाच्या विस्तारित कक्षेत कार्यरत. राहणे, यंत्राच्या गतिशिल भागात अडथळा न आणणे, पाण्याचा अंश थोपवून धरणे इत्यादी कारणांसाठी ग्रीजची गरज असते.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply