ग्रीष्माची काहिली सोसता,
धरणीला संजीवन -डोहाळे,
संततधार वरुन बरसतां,
तनी–मनी तिच्या पावसाळे,–!!!
निराळीच प्रीतीची तऱ्हा,
प्रेम असते आगळे,
थेट भिडे ती गगनां,
सृष्टीचे शृंगारलेणे,–!!!
प्रणयाची रीत पहा,
गगन धरतीवरी झुके,
आपुले देणे देई धरा,
प्रेम बोलके असून मुके,–!!!
गगन गाजवी पुरुषार्थ,
काम क्रोध मोहा,—
वसुंधरा स्त्रीच शेवट,
निमूट करते संसारा,
ऋतू पालट होता होता,
पृथा गर्भार राहे,
नभ उघडे आपला डोळा,
तिला तशीच पहात राहे,–!!!
संजीवन -डोहाळे लागता,
आभाळ तिचे लाड पुरवे,
संजीवन पिता पिता,–
ती काळी आई बने,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply