सनातन भारतीय संस्कृतिनुसार वर्षातील साडेतीन मुहूर्त अतिशय महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया व विजयादमी हे पूर्ण मुहूर्त आहेत. कार्तीक शुक्ल बलि प्रतिपदा हा अर्धामुहूर्त आहे. या दिवशी कार्यरंभ केल्यास कार्य सिध्दीस जाते. हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. वर्षातील पहिला मुहूर्त गुढीपाडवा होय म्हणूनच याला विशेष महत्व आहे. वर्ष भरा चे सद्संकल्प या दिवशी करावयाचे असतात. सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. विकारी नाम संवत्सर शालीवाहन शके १९४१ शनिवार दिनांक ०६/०४/२०१९ पासून सुरू होत आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात जनता आपल्या घरावर गुढी उभारते एका काठीला कडुनिंबाची अगदी बारीक बारीक फांद्या, गाठ्या, गडवा, भगवा ध्वज व पोलक्याच कापड लावण्यांत येते. भगवा ध्वज म्हणजे वैराग्याचे प्रतिक, पोलक्याचे कापड म्हणजे देवीच्या शौर्याचे प्रतिक, काठी म्हणजे शस्त्राचे प्रतिक होय. श्रीकृष्णाने गीता सांगितली पण त्यांचे हातात सुदर्शन चक्र होते. यांतील भावार्थ म्हणजेच गुढी उभारणे होय. या दिवशी सकाळी मंगल (अभंग) स्नान करण्यांत येते. सद्गुरुची व विविध देवदेवतांची अंत:करणापासून पूजा करण्यांत येते. घरातील सर्वजण नविन वस्त्रे धारण करतात. ते विनम्र भावाने वर्षफल ऐकतात. संवत्सर फलांत साधारणपणे वर्षभरातील हवा, पाणी, पीक यांचे वर्णन असते. वर्षफल गुढीपाडव्यास श्रवण केल्यास धन, धान्याची व आयुष्याची वृद्धी होऊन नविन वर्ष सुखसमाधानाने जाते. अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सस्य सर्व सुखंच वत्सरमुलं सशृण्यता सिद्धीम् ! अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे. भारतीय प्रथांना रितीरिवाजांना व प्रतिकांना निश्चित व तर्कशुद्ध आधार असतो. असे बहुतेक प्रकरणांत आढळून आलेली आहे.
फाल्गुन व चैत्र महिन्यात वसंतऋतुचा काळ असतो. अतिशय थंडी अगर अतिशय गरमी या संधिकाळात नसते. म्हणून गुढीपाडव्याला कडुनिबाची कोवळी पाने, फुले त्यांत मिरे, हिंग, मीठ व जीरे वगैरे आकून ते चुर्ण भक्षण करण्यांत येते. हे पाचक व रोग प्रतिकारक चूर्ण असते. मोहरीच्या तेलाची मॉलीश करून उन्हांत बसल्यास व पळसाच्या फुलाचे उटणे करून त्यांत कडुनिबांची पाने टाकून स्नान केल्यास प्रकृती धडधाकट राहते. या ऋतुत पानझड असते. झाडांना कोवळीपाने फुटतात. आम्रमोहर येतो. मोगऱ्यांची सुगंधी फुले, पळसाची नयनरम्य फुले व कडूनिबांची अमृतफुले याच गुढीपाडव्याच्या सुमारांस आढळून येते. सृष्टीत नवचैतन्य येते. या दिवशी घराघरावर आम्रानाची तोरणे लावण्यांत येतात. सण व उत्सव साजरे करणे हा भारताचा स्थायीभाव आहे. सकारात्म कार्यपद्धतीमुळे व संयमामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षापासून आज ही टिकून आहे. इतर अनेक संस्कृती काळाच्या ओघात नष्ट आहेत.
सध्या कलीयुग सुरू आहे. हे ४,३२,००० वर्षाचे आहे. त्यांतून फक्त ५१२० वर्षे संपलेली आहेत. व ४२६८८० वर्षे शिल्लक आहे. गुढीपाडव्यपासून शालीवाहन शक सुरू झाले आहे. शाली वाहन हे कुंभार समाजाचे असून ते ते महाराष्ट्रातील पैठणीचे राहणारे होते.
त्यांनी मातीचे सैनिक करून व त्यांत प्राण फुंकून शत्रूवर विजय मिळविला होता. असे सांगण्यात येते. याचा मतितार्थ असा आहे की, त्यांनी निर्जीव व निस्तेज समाजात चैतन्य व राष्ट्रभक्ति निर्माण करुन प्रभावी शत्रूचा पराभव केला. पंचागासाठी अनेक आधार संदर्भ त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत.
गुढीपाडव्या पासून पश्चिम महाराष्ट्रांत गौरीचे आगमन होते, असे मानण्यात येते, यावेळी सुंदर, सुंदर रांगोळ्या काढण्यात येतात. यालाच “चैत्रांगण” म्हणतात. मलबार मध्ये हा सण विशिष्ट पद्धतीने साजरा करण्यांत येतो. घरातील मुख्य व्यक्ति त्यांच्या गृहलक्ष्मीसह कुलदेवताचे पूजन करते व सर्वसंपत्ती देवाच्या पायापाशी ठेवते.
प्रभु श्रीरामरायाचे नवरात्र गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. श्रीराम या शब्दांशी भारतीयांचे अगदी जवळचे नाते जोडेले आहे. यापुढे रामराज्यच यावे.
अशी जनतेची अपेक्षा आहे. गुढीपाडव्यापासुन साधारणपणे “श्रीरामचरित” मानसाचे पारायण करण्यांत येते. श्रीरामचरीत्र मानसाच्या बालकांडात श्रीरामप्रभूचे व या कालावधीत येत असणाऱ्या ऋतुचे अतिशय बहारदार वर्णन केलेले आहे.
चर अरू अचर हर्षजयुत ! राम जन्म सुख मुल सितल मंद सुरभि वह वाऊ! हर्षित सुर संतन मन चाऊ बर्षही सुमन सुअंजली साजी! कह गयी गगन दुंदंभी वाजी गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रघुराईने वालीच्या अत्याचारातून जनतेची सुटका केली.
भोगावर त्यागाचा, वैभवावर विभुतीचा व विकारावर विचाराचा विजय म्हणजे गुढीपाडवा. ज्ञानाची गुढी खांद्यावर घेऊन विज्ञान व अध्यात्माची वाटचाल करु या. हा गुढीपाडवा निमित्त असणारा संदेश समजून घेवू या. विजयोत्सव म्हणजेच गुढीपाडवा होय.
–मो. वा. चरेगांवकर
मो. ९७६७०५९३२८
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १२ वा, (अंक २४)
Leave a Reply