गुलाबी थंडी आल्हाद गारवा
छेडीते मज ही धुंद गार हवा
मादक नाशिली रात्र धुंदावली
शिशिरातील चांदणे तारका हासली
अलवार मिठीत घे वेढून तू मजला
ओठ ओठांनी अलवार टिपून घे जरा
मदमस्त हवा तू ये जवळ असा
पदर ढळतो होईल वारा अवखळसा
अलगद मिठीत घेशील तू मजला
साखर चुंबनात लाजेन मी तेव्हा
रात्र रसिली धुंद गुलाबी गंधित हवा
लाजते तुझ्यात गंधाळून मी आता
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply