हल्ली गजबजलेला झांझीबार शहरमध्यात असला तरी त्यावेळी ‘स्टोनटाऊन’ला समुद्रमार्गाने पोहोचता यायचे. गुलामांसाठी पंधरा कारागृहे होती. छप्पर खालच्या पातळीवर असे व आत छोटी गवाक्षे होती. पुरूषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळी कारागृहे होती. बरेचजण कोंदट हवेत दाटीवाटीमुळे गुदमरून मरून जात असत. विक्रीच्या वेळी गुलामांना न्हाऊ माखू घालून, तेलाने चोपडून बाजारपेठेत आणले जाई. स्त्रियांना नटवून गळ्यात हार व हातात बांगड्या घालून बाजारात आणले जाई. सर्वाची उंचीनुसार एक-कतारमध्ये परेड निघे. त्याचवेळी गुलामांची किंमत जाहीर होई.
धनवान गिर्हाईक गुलामाचा अंतिम सौदा करण्यापूर्वी त्याच्या शरीर-सौष्ठवतेची खात्री करत. गुलामाच्या सहनशक्तीच्या चाचणीसाठी एक स्तंभ होता. स्तंभाला बांधून चाबकाने त्याला फटकारतांना जे गुलाम रडत नसत अथवा भोवळ येऊन कोसळत नसत त्यांचा भाव मोठा. तब्बल दोनशे वर्षानंतर म्हणजे एकोणीसाव्या शतका अखेर झांझीबारची गुलाम खरेदी विक्री थांबली.
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply