नवीन लेखन...

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग १

(संदर्भ : ‘लोकसत्ता’ दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील लेख)

लोकसत्ताच्या दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील गुलजार यांचा लेख सुंदर आहे, पण तो ललित लेख स्वरूपाचा आहे. हा लेख म्हणजे गुलजार यांच्या गालिब समजून घेण्याचा पुन:प्रारंभ आहे, असें लोकसत्ता म्हणताहे. तेव्हां पुढील लेखांची वाट पहावी लागेल. मात्र हेंही खरें की प्रस्तुतचा लेख वाचून बराचसा अपेक्षाभंग झाला. गुलजार यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही असें म्हणावेसें वाटतें की, ‘मिर्झा गालिब’ ही आपली टी. व्ही. मालिका काढायच्या वेळीं गुलजार यांनी जी पटकथा, स्क्रिप्ट लिहिलें असणार, त्या ‘पोतडीतून’ हा ललित लेख बाहेर काढलेला आहे.

म्हणूनच, या लेखातील किती इंटरप्रेटेशन (अर्थनिष्पत्ती) योग्य वाटतें व किती नाहीं, ही चर्चा उपयुक्त ठरेल.

  • ‘कोई उम्मीद बर नहीं आती’

एखादी कविता/ शायरी लिहितांना काय परिस्थिती होती, आपले मनोव्यापार काय होते, ही बाब फक्त, आणि फक्त, कवी / शायरच जाणतो. त्यानें मौखिक किंवा लिखित स्वरूपात त्यासंबंधी कांहीं मांडलेलें असेल, तरच इतरेजन तें जाणूं शकतात. त्यानें तसें केलें नसल्यास, त्याबद्दल आपण , परिस्थीचा विचार करून, कयास बांधूं शकतो. गालिब यांचा बराच पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यात त्यांनी, अमुक शायरीच्या लेखनामागे काय भावना होती, काय प्रेरणा होती, असें लिहिलेलें आहे काय ? मी स्वत:ला मोठा जाणकार अजिबात मानत नाहीं. पण मी गालिबवर जें कांहीं थोडेंफार समीक्षात्मक लेखन वाचलेलें आहे, खासकरून हिंदीत, त्यावरून, गालिब यांनी या विशिष्ट शायरीलेखनाची पार्श्वभूमी लिहिलेली आहे, असें मला तरी प्रतीत झालें नाहीं. मात्र, गालिबचें जीवन पाहतां, हा उपरोल्लिखत विशिष्ट मत्ला लिहिण्यामागे काय पार्श्वभूमी होती-असणार याची कल्पना येते, आणि ती पार्श्वभूमी गुलजार यांनी कल्पिल्यापेक्षा भिन्न आहे .

गालिब यांच्या पुरख्यांना पेन्शन मिळत असे. तें पुढे आपल्याला चालूं राहील असें गालिब यांना वाटल्यास, ती अपेक्षा साहजिकच होती, असें म्हटलें पाहिजे. पण तें पेन्शन त्यांना प्राप्त झालें नव्हतें. म्हणून, त्यासाठी गालिब यांनी बराच काळ कलकत्याच्या कंपनी सरकारशी पत्रव्यवहार केला, फॉलो-अप केला. नबाबी संस्कृती, पेन्शनविणा गुजारा करणें कठीण होत होते, पण पेन्शनसाठीचे सारे प्रयत्न व्यर्थ जात होते (in vain).  अशा वेळीं ,पेन्शन मिळण्याच्या संदर्भात, गालिबना वाटलें होतें- असणार की , पेन्शन प्राप्त करून घेण्यांची ‘कोई उम्मीद बर नहीं आती । कोई सूरत नज़र नहीं आती।’

(अशा परिस्थितीत, त्यांच्या एका चाहत्यानें सुचवलें की पेन्शनसाठीचा फॉलो-अप गालिब यांनी कलकत्त्याला स्वत: जाऊन करावा. आणि, त्यानुसार गालिब कलकत्त्याला गेलेही होते ).

कर्जाची परतफेड ही मोठी गोष्ट खरी ; पण त्याबद्दल हा मत्ला नसून , त्यामागील जें मूळ कारण , म्हणजे पेन्शनचें मिळणें / न_मिळणें, या बाबीच्या विचारातून हा मत्ला लिहिला गेला, असें म्हणायला हरकत नसावी.

  • ‘काबा किस मुँह से जाओगे गालिब’

गुलजार यांच्या या लेखावरून असें दिसतें की , जणूंकांहीं, कर्जफेड करूं शकले नाहींत, म्हणून गालिबना स्वत:ची लाज वाटली, आणि त्यातून हा शेर निर्माण झाला.

मात्र, गालिबच्या शायरीतून त्यांचें जें व्यक्तिमत्व पुढें येतें, त्यावरून, अशा तात्कालिक कारणावरून त्यांनी हा शेर लिहिला असावा हें योग्य वाटत नाहीं.

  • खरें तर गालिब हे धार्मिक नव्हतेच. इतरत्रही त्यांनी म्हटलेलें आहे – ‘बंदगी में मेरा भला न हुआ’ । हे पश्चात्तापाचे बोल नसून वस्तुस्थितीचें वर्णन आहे, कारण बंदगी तर गालिब यांनी केलीच नव्हती. आणि या बोलांमध्ये एक दडलेला संदेश सुद्धा आहे की, ‘अरे मित्रा, बंदगीनें माझें भलें झालेलें नाहीं. हा माझा स्वानुभव आहे. तो ध्यानात घे, आणि जाणून घे की बंदगीनें — भक्ती करून — कुणाचेंच भलें झालेलें नाहीं. तुझेही होणार नाहीं’.
  • असें म्हटलें जातें की १८५७ च्या ‘गदर’नंतर, एका इंग्लिश फौजी अधिकार्‍यानें गालिब यांना त्यांचा धर्म काय तें विचारले. गालिब उत्तरले, ‘हुजूर, मी अर्धा मुसलमान आहे’. ‘तें कसं ?’, अधिकार्‍यानें पृच्छा केली. ‘ कारण मी हॅम (डुकराचें मांस) खात नाहीं, पण शराब मात्र पितो’, इति गालिब.

आपण मशिदीत जात नाहीं, शराब पितो, जुआ खेळतो, तथाकथित धर्म पाळत नाहीं, याबद्दल गालिब यांच्या मनात कसलीही ‘गिल्टी’ (अपराधी) भावना होती, असें प्रतीत होत नाहीं.

‘मैं न अच्छा हुआ बुरा न हुआ’ हा शेरचा मिसरा पहा ( मग तो भिन्न संदर्भात लिहिला गेला असेना कां ). ‘मैं बुरा न हुआ’, म्हणजेच मी बुरा नाहींये, असें गालिबनें स्पष्ट नोंदवलेलें आहे. त्यामुळे, गिल्टी भावनेचा प्रश्नच येत नाहीं.

‘शर्म तुझको मगर नहीं आती’ हे शब्द म्हणजे, गालिबनें स्वतचें केलेलें chiding नसून, तें, गालिब एकप्रकारच्या अलिप्तपणें, किंवा अभिमानानें,  सांगत आहेत. आजही नाहीं कां, आपण असे कांहीं लोक पाहतो, जे सहजपणें सांगतात, किंवा कधीकधी अभिमानानें सांगतात की, ‘मी मंदिरात जात नाहीं, मी रिच्युअल्स् (rituals, कर्मकांड) पाळत नाहीं, मी देवपूजा करत नाहीं, मी निरीश्वरवादी आहे, वगैरे वगैरे . तसेंच हें गालिबचें कथन .

गालिब हे पारंपरिक ‘धार्मिक’ कधीच नव्हते. त्यांचा हा एक शेर पहा.  त्यात काब्याचा उल्लेख वेगळ्या संदर्भात आहे. ( हा शेर व अर्थ – संदर्भ  – डॉ. विनय वाईकर यांचें ‘कलाम-ए-ग़ालिब’).

शेर असा –

‘काबे में जा रहा, तो न दो ताना, क्या कहीं

भूला हूँ हक़्क़-ए-सोहबत-ए-अहल-ए-कुनिश्त को ?’

( हक़्क – सत्य ; कुनिश्त – मंदिर ; अहल – लोक, माणसें  ; सोहबत – संगत, सोबत )

मी काब्याला निघालोय्, म्हणून मला टोमणे मारूं नका. (पूर्वी) जनांना मंदिरांची संगत होती (आपल्या लोकांसंगें मूर्तिपूजकांचा सहवास होता) हें सत्य मी विसरलेलो नाहीं.

कलकत्ता येथें पेन्शनच्या कामासाठी जातांना गालिब बनारसला पोचले. ते तिथल्या (हिंदू धार्मिक) वातावरणानें इतके खुश झाले की कांहीं आठवडे ते बनारसलाच राहले, आणि त्यांनी बनारसवर एक प्रदीर्घ मस्नवीही लिहिली. एक प्रकारची धर्मातीतताच ही.

त्यामुळे , गुलजार यांनी सुचवलेलें आहे तसें, ‘काबा किस मुँह से जाओगे गालिब’ हा शेर गालिबनें ‘लाज’ वाटून लिहिला, अपराधी भावनेनें लिहिला , हें योग्य वाटत नाहीं, तर त्यांनी तो अलिप्त भावनेनें, अथवा अभिमानानें, लिहिलेला आहे, हेंच खरें.

(पुढे चालू )

— IITian सुभाष स. नाईक   
मुंबई
मोबाईल : ९८६९००२१२६ , ९०२९०५५६०३.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in
वेबसाईट : www.subhashsnaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..