एप्रिल व मे महिन्यात गुलमोहोर फुलतो. त्याच्या पाकळ्यांचा सडा जमिनीवर पडतो. ह्या 10–15 पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून, सकाळ दुपार व संध्याकाळ हे पाणी पिण्याने उन्हाळ्याच्या उष्णतेचा त्रास व पित्ताचा त्रास कमी होतो.
माझी आई व सासुबाई दोघीना पित्ताचा खूप त्रास होता. त्या दोघीना गुलमोहोराचे पाणी रोज दिले. आणि त्याना पित्ताचा त्रास पुढे सहा सात महिने झाला नाही.
माझे संशोधनात कंपवातावर गुलमोहोर उपयोगी पडेल असे आले. डोंबिवलीच्या एका गृहस्थानी मी सांगितल्या प्रमाणे गुलमोहोराचे पाण्याने कंपवात कमी झाल्याचे फोन करून सांगितले. तसेच माझ्या एका 73 वर्षे वयाच्या मित्राना हे पाणी 3-4 महिने दिले. त्यांना चहा पिताना कप किंवा बशी इतकी हालायची की चहा पिणे नको व्हायचे ते आता व्यवस्थित एका हाताने चहा पितात.
गुलमोहोराच्या फुलांचे सरबतही करता येते. बर्याच पाकळ्या मिक्सरमधून फिरवून चांगल्या क्रश कराव्यात व पाण्याबरोबर मिसळून चवी प्रमाणे साखर मीठ घालून प्यावे. ह्यामुळे उन्हाळ्यातील गर्मीचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे.
— अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,
आनंदनगर, पुणे
Leave a Reply