नवीन लेखन...

गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ…!!!

गुळवेल ह्या वनस्पतीला भारतीय उपचार पद्धती तथा आयुर्वेदात फार महत्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे,जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती सहजतेने जीवंत असते.

भारतातील सर्व भागात ही वनस्पती सहजतेने उपलब्ध होते. या वनस्पतीच्या उपयोगा संदर्भात विविध ऋषींनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये महत्वपूर्ण माहिती लिहून ठेवलेली आहे, ती पुढीलप्रमाणे-

” पिवेद वा षटफल सर्विरभयां वा प्रथो जयेत |
त्रिफलाया: कषाय वा गुडूच्या रसमेव वा ||”
– (चरकसहिंता )

” पिप्पला मधु संमिक्ष गुडूची स्वरसं पिवेत |
जीर्णा ज्वर कफ प्लहिका सारोचक नाशनम || ”
-( भैषज्य रत्नावली )

” गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |
संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||
दोषज्यामतृडदाहमेहकासाश्च पाण्डूताम |
कामला कुष्ठवातास्रज्वरकृमीवमीर्हरेत ||”
-(भाव प्रकाश )

अशा विविध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या गुळवेलाची वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेली नवे पुढीलप्रमाणे –

Latin name – Tinospora cordifolia Willd , कुळनाव-Menispermaceae , संस्कृतनाव- अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, मधुपर्णी वत्सादनी, कुण्डलिनी मराठी नाव- गुळवेल, अमृता, हिंदी नाव- गीलोय, गुडिच English name – Tinospora , अशी विविध भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत.

रासायनिक घटक- ग्लुकोसीन, जीलोईन, १.२ टक्के स्टार्च, बर्वेरीन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कैसमेंथीन, पामारीन, रीनात्पेरीन, टीनास्पोरिक, उडनशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लीस्टोराल इत्यादी घटक आढळतात.

एवढे महत्वपूर्ण घटक असलेल्या या वनस्पतीमध्ये ‘मायक्रोबैक्टेरीयम ट्युबरकुलौसिस’ (Tuber Culosis), ‘एस्केनीशिया कोलाई’ या आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगाणु ला नष्ट करते, तसेच विषाणू समुह व कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता या दिव्या वनस्पतीमध्ये आहे.

औषधी उपयोग- नेत्र विकार, वामन, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कैन्सर, त्रिदोष नाशक, त्वचा रोग, मधुमेह, हृदयाला बल देणारा, रक्तशर्करा आदी विकारांवर प्रभावी औषध आहे.

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..