करूं म्हटले करूं न शकलो
रोकू म्हटले रोकू न शकलो
जे जे स्फूरले येईल ते ते
ठरले असते होईल ते ते
बघूनी बाह्य जगला ठरवी
मिळवीन तेच सुख भावी
त्याचेसाठी स्थिती आगळी
उमज न येई ती सगळी
धडपड करीतो गडबड करीतो
त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो
सुप्त गुण हे अंगी लपले
उभारून ते येतील सगळे
मात करूनी विचारावरती
सुप्त गुण हे विजयी होती
गुणधर्म ही ईश्वरी योजना
घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply