नवीन लेखन...

गुंता

केसात गुंता झाला की कंगव्याच्या मोठ्या दातांनी तो सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला जातो. पण तो गुंता इतका पक्का असतो की सुटत तर नाहीच उलट खूप वेदना होतात सहन होत नाही म्हणून तो तोडूनच काढावा लागतो. आर्थात इच्छा होत नाही पण नाईलाजाने का होईना मान्य करावे लागते.

आयुष्यात कधी ना कधी असे काही प्रश्न निर्माण झाले की ते सोडवायचा जो जो प्रयत्न करावा तो तो जास्तच त्रासदायक होऊ लागतो अश्या वेळी तो तोडूनच काढावा लागतो. वाईट वाटते पण….
गुंता दुसरा भरत काम किंवा कपडे शिवणे. फुलांचा हार वगैरे करताना दोरा बारीक असतो रेशमी असतो म्हणून काळजी पूर्वक काम करावे लागते. तरीही अनवधानाने एकमेकात दोरा गुंतून जातो. आणि कितीही हळुवार पणे सोडवले तरी गुंता तर सुटत नाहीच पण कपड्याचे पोत बिघडतो. अशा वेळी दोरा वाचवणे महत्वाचे नसते तर कपडा वाचवणे महत्वाचे. त्यामुळे ते तिथेच थांबवून परत दुसर्‍या दोऱ्याने सुरवात करावी….

संसाराचा हा सारीपाट असाच उभ्या आडव्या म्हणजे एक आणि शंभर धाग्याने विणत असताना नकळतपणे गुंता झाला की संसाराचे पोत बिघडले जाउ नये म्हणून तिथल्या तिथे सोडून दिले व झाले गेले विसरून परत नव्याने सुरूवात केली तर सगळेच हितावह. गुंतागुंतीतून सुटका.

वीणकामाची उलन आणून ती गुंडाळून ठेवताना हमखास गुंता होतोच. किंवा लहान मुले ते घेऊन पळताना तेव्हा हा गुंता सोडवताना फार त्रास होत नाही कारण ती उलन थोडी जाड असते म्हणून हळूहळू का होईना सुटतोच. नुकसान होत नाही. एकातून एक उलन सुटत जाते..

असेच होते कधी कधी. काही कारणाने गुंतवणूक झाली की समजत नाही. म्हणून त्याचा बाऊ न करता चिकाटीने जिद्दीने थोडी मेहनत घेतली तर मार्ग सापडतो. आणि नुकसान अजिबात नाही. त्यामुळे पहिल्या पासूनच काळजी घेतली पाहिजे..
काही वेळा धार्मिक. श्रद्धा. विश्वास. आदर. अनामिक भीती. संस्कार पंरपंरा वगैरे गोष्टी मुळे नाजुक भावनेने गुंता सोडवताना सुवर्ण मध्य असावा. उदा. महालक्ष्मीचे दोरे. जानवे. लग्नाच्या वेळी कंकण. किंवा धार्मिक विधी करताना दोरा गुंतून गेला. तुटला….

तर ते फेकून दिला जात नाही. सोडवला जात नाही म्हणून तर श्रद्धेने जपून ठेवला जातो. आणि यातून मिळते समाधान. असेच समाधान कायम राहण्याची गरज असते जीवनात. काही गुंता असाच असतो. तिथे श्रद्धा. विश्वास. भिती. अशी अनेक कारणे असतात त्यामुळे ती जपून ठेवावीत. तडकाफडकी निर्णय घेवून काही तरी केले की जन्म भर हुरहुर लागते. गेलेली वेळ परत येत नाही. जोपर्यंत जपता येइल तोपर्यंत जपावे लागते….

असे अनेक प्रकार असतात गुंत्याचे. आणि आपण त्यात गुंतल्याने होतो तो फक्त त्रास. त्यामुळे गुंता कशाचा आहे आणि तो कोणत्या मार्गाने सोडवायला हवा याचा सांगोपांग विचार करून मगच गुंता सोडविण्यासाठी तयार रहा…..

– सौ कुमुद ढवळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..