लहान असेंन मी त्यावेळी आठवी नववीत जेव्हा त्यांचे लग्न झाले तो गावाकडचा पण शहरात स्थायिक झालेला, चांगली नोकरी होती परंतु लगेचं करत नव्हता. एकदाचे त्याने उशीरा का होईना लग्न केले. ती पण जरा जास्त वयाची होती, थोडी रखडलेली होती. कमी शिकलेली , मॅट्रिकपर्यंत घरात गावी सगळी कामे करत असे. अत्यंत सडपातळ , उंच पण अत्यंत मेहनती होती. गावाकडे आजारी पडायची पण , बरी होत असे. आई नव्हती म्हणून जबाबदारी तिच्यावर , ती वहाता वहाता तिचे लग्नाचे वय कधी कधी निघून गेले हे कळलेच नाही.
मी त्यांच्या घरी नेहमी जात असे लहानपणी ..दूरचे नातेवाईक होते ते आमचे . त्याकाळी दूरचे म्हटले तरी खूप जाणेयेणे असे. मी गेलो की मला गणित वगैरे शिकवत असे. का कुणास ठाऊक मला तिचे समाजवणे खूप आवडत असे. अत्यंत सहजपणे ती कोकणी भाषेतले शब्द वापरून वातावरण चागले ठेवत होते.
तिचा नवरा दखील खुश होता कारण बऱ्याच वर्षाने त्याच्या घराला स्त्रीचे पाय लागले होते कारण त्याला आईवडील कोणीही नव्हते स्वतः नोकरी करून शिकला , मोठी नोकरी मिळवली . लग्नासाठी तो डेअरींग करत नव्हता नाही पटले तर तसा तो तिरसट होता पण माणूस म्हणून खरेच चागला , ती पण शांत स्वभावाची, मोठे कुंकू लावणारी.
आमच्या घरीही ते येत असत. उत्तम संसार चालला होता , मूल झाले पाहिजे असे प्रत्येकाला वाटत होते परंतु त्यांचे म्हणणे होते इतके दुःस्वास मेहनत केली , आता हिंदू फिरू.
वर्ष दोन वर्षे गेली. मी पण कॉलेजला दुसऱ्या शहरात हॉस्टेल मध्ये गेलो. घरी आलो की भेट होत असे. ह्यावेळी आलो तेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा ती पलंगावर झोपलेली दिसली. मी विचारले तशी ती म्हणाली गल्ली पाय खूप दुखतात . आयुर्वेदिक औषध चालू आहे खूप गप्पा झाल्या.
संध्याकाळी तेच नवरा घरी आल्यावर गप्पा मारल्या, तिने जरा कष्टाने स्वयंपाक केला , मला वगेळेच वाटले. तिला काय आजार झाला हे हे कळेना , पूर्वी त्यावेळी एकदम सगळ्या टेस्ट पटापट करणे शक्य नव्हते.
तरीपण तिच्या नवऱ्याला मी सागितले चेकींग करून घे. तो म्हणाला तिला वाताचे दुखणे आहे लहानपणापासून. अंगावर काढलेले , गावात काय सोय नसायची. एक दोन दिवस झाले मी परत शहराकडे आलो.
मी माझ्या अभ्यासात होतो, काळ पुढे जात होता , जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जात होतो तेव्हा ती जास्तच खचलेलली, अंथरुणाला खिळलेली जाणवत होती आता उठताही येत नव्हते , नवरा स्वयंपाक करत होता , दोघे रहात होते.
अशी दहा ते बारा वर्षे गेली. तिचा चेहरा तजेलदार होता, दरोरोज ती वेळी घालत होती, तिचे मोठे कुंकू पण , कमरेपासूनचा भाग अचेतन.
नशीब एकेकाचे. असे म्हणत मी माझ्या मार्गाला लागलो. नोकरी लागली. मधून मधून जात होतो, पण तसा वेळ मिळत नव्हता.
परवाच बातमी आली ती गेली. इनमीन दोन वर्षाचा संसार केला नवऱ्याबरोबर मग जे अंथरून धरले ते शेवटपर्यंत सोडले नाही.
मी उशीरा गेलो. सगळे विधी झाले होते. नवरा घरी होता, तो पुढील दिवस करतात त्या गडबडीत होता परंतु मी आलेला पाहून त्याचा बांध फुटला. काय समजूत घालणार त्याची.
दोघांचा सुंदर फोटो भिंतीवर होता. पलंगावर गादी , चादर नवीन घालून नीट ठेवला होता, एकदम रिकामा पलंग पाहून मलाही वाईट वाटले. कोपऱ्यांत तिच्या वस्तू होत्या. तितक्यात तो म्हणला थांब मी दूध घेऊन येतो , चहा करू, तो बाहेर गेला. कोपऱ्यांत एका प्लॅस्टिकच्या भाड्यात तिची कुंकवाची पेटी आणि कंगवे होते , मी सहज जवळ गेलो तर एका कंगव्याला गुंता झालेले केस होते कारण तिला केस विचारून व्यवस्थित ठेवण्याची आवड होती.
मला भडभडून आले . तो बाहेरच होता दूध आणायला गेलेला मी शांतपणे त्या एका कंगव्याचा केसाचा गुंता कंगव्यातून काढला आणि माझ्या खिशात ठेवला. मला खरेच समजले नाही मी तो केसाचा गुंता अचानक , अनाहूतपणे माझ्या खिशात मी का ठेवला.
बाहेर पडताना मला जाणवलं
….की इथे आलो की त्यांच्याकडे मी का जात होतो ते ?
-सतीश चाफेकर
Leave a Reply