नवीन लेखन...

गुरु महिमा

श्री गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री सद्गुरूवे नमः

आज व्यासपौर्णीमा. महर्षि व्यासमुनी यांना आद्य गुरु मानले जाते. म्हणून आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा असे संबोधले जाते. या दिवशी आपल्या गुरुची पुजा करुन त्यांचे विषयी आदर व्यक्त केला जातो. तसे गुरु हे आपणास कायमच वंदनीय असतात व आपण गुरुविषयी सदैव आदर बाळगत असतोच त्याच आपल्या गुरुप्रती असलेल्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाला महत्त्व आहे.

मानवी जिवनामधे गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपली माता किंवा माऊली ही आपली आद्य गुरु होय. प्रत्येक माता आपल्या बालकाला जन्मल्यापासून शिकवत असते. माता शिकवेल त्याप्रमाणे ते बालक शिकत असते. ती आपल्या बाळाला बोलायला चालायला शिकवते. लहानपणी मुलावर चांगले संस्कार करुन आपले मुल हे समाजात एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून कसे नावारूपाला येईल याची ती काळजी घेते. म्हणूनच तिला मानवी जिवनातील प्रथम गुरुमानले आहे. कोणत्याही समाजाची प्रगती हीहि त्या समाजातील व्यक्तींवर अवलंबून असते. समाजातील व्यक्ती जितक्या सुसंस्कृत असतील तेवढा तो समाज प्रगती करत असतो. व असा समंजस व सुसंस्कृत समाज राष्ट्र घडणीत महत्वाची भुमिका बजावत असतो.आई नंतर दुसरा गुरु हा पिता किंवा वडील असतात. आई मुलाला सुसंस्कृत करते तर त्याचे वडील त्याला समाजात वावरताना कसे वागावे याचे व्यावहारिक शिक्षण देतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांची कशी काळजी घ्यावी, त्यांचे संगोपन व संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करीत असतात. अर्थार्जन करुन कुटुंबाची जबाबदारी घेण्याची शिकवण दिली जाते. ते स्वतः आईवडिलांबरोबर कशा पध्दतीने वागतात ह्यातून ते मुलांना एक प्रकारे शिकवणच देत असतात.

आईवडिलांनंतर शिक्षक जे शालेय जिवनातत्याला विविध विषयांचे शिक्षण देतात ते गुरु.या गुरुंचे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्वाचे स्थान आहे. आपण आयुष्यात पुढे कसे घडणार हे या शिक्षकांवर सर्वस्वी अवलंबून असते. चांगले शिक्षक मिळणे यासारखे दुसरे भाग्य नाही. व असे चांगले शिक्षकच चांगले विद्यार्थी व चांगला समाज निर्मितीचे कार्य करीत असतात. हाच समाज राष्ट्र निर्माण करीत असतो. कोणत्याही राष्ट्र किती संपन्न आहे हे तेथे शिक्षकांचे समाजात स्थान काय यावर अवलंबून असते. ज्या राष्ट्रात शिक्षकांना मानाने वागवले जाते त्या राष्ट्राची प्रगती ही सर्वात चांगली होते. म्हणून शिक्षकांना नेहमीआदराचे स्थान असावे.

शिक्षकांनंतर महत्त्वाचे स्थान असते ते आध्यात्मिक गुरुंना. प्रत्येक व्यक्तीचे एक श्रध्दास्थान असते व त्या नुसार ती व्यक्ती आपल्या आध्यात्मिक गुरुची निवड करते. तुम्ही कोणत्याही जाती,धर्माचे असा तुमची कुठे ना कुठे श्रद्धा असते व ती व्यक्ती त्या प्रमाणे त्या श्रद्धा स्थानाची भक्ती करत असते. तुम्ही कोणालाही गुरु स्थानी मानून त्याची भक्ती करु शकता. पण एकदा एका ठिकाणी श्रध्दा ठेवली की ती कायम ठेवावी. कोणी सांगते म्हणून विचलीत होऊ नये. आपल्या मनाला जे योग्य वाटते व पटते त्या प्रमाणे कृती असू द्या. जिवनात कोणीतरी आध्यात्मीक शक्ती आपल्या पाठीशी असणे हे महत्त्वाचे आहे. ती शक्तीच आपल्याला कठीण परिस्थितीत शांत चित्ताने निर्णय घेण्याची शक्ती प्रदान करते. आपल्याला कायम सन्मार्गावर ठेवते. त्यासाठी आध्यात्मीक गुरु जिवनात असणे अत्यंत गरजेचे आहे.

हे झाले मुख्य गुरु. यानंतर जिवनात पदोपदी आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात त्या आपल्याला काही ना काही शिकवत असताना. व त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा नकळत आपणास फायदा होत असतो. आपल्या जवळपास रहाणारे शेजारी, शालेय जीवनापासून आपले मित्र अगदी आपण ज्या कार्यालयात नोकरी व्यवसाय करतो तेथील कनिष्ठ कर्मचारी सुध्दा आपणास बरेच वेळा चांगले मार्गदर्शन करीत असतात. तेही एक प्रकारे आपले गुरुच असतात.

अशा सर्व प्रकारच्या गुरुंचे स्मरण करून त्यांचे बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस. चला तर मग या मंगलदिनी अशा आपल्या सर्व ज्ञात अज्ञात गुरुंना वंदन करुया.

 

— सुरेश काळे

मो. 9860307752

सातारा.

(गुरुपौर्णिमा २७ जुलै २०१८)

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..