रोज थोडे तरी कार्य
केल्यावाचून राहू नकोस,
ब्रह्यांडनायक पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरु नकोस….
तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही…
पायात पाय घालून पाडवतीलही….
घाबरून त्यांना तू तुझं
उभे राहणं सोडू नकोस..
सद्गुरू पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही…
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असंही नाही…
तू मात्र इतरांचं कौतुक
करण्यास कधी कचरु नकोस…
सद्गुरु पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुला सुद्धा मन आहे
माहीत आहे सद्गुरूला…..
पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे कमी तुला….
इतरांना भरभरून देणं
मात्र कधी सोडू नकोस …
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
रडावंसं वाटत तेव्हा
रडून सरळ मोकळा हो…
कार्यासाठी लढावंसं वाटत तेव्हा,
लढून ही मोकळा हो….
रडण्यामध्ये मात्र तुझे
कार्य कधी विसरू नकोस
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझ्या कार्याचे पुरावे
कोणाला द्यायची गरज नाही…
कुणासाठी तुला कार्य
सोडायचीही गरज नाही….
सद्गुरू संकल्पासाठी पुढे
चालणं सोडू नकोस..
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
Leave a Reply