नवीन लेखन...

गुरुदासाचे हितगुज

मी अगदी साधा सामान्य माणूस. आम आदमी कुठच्याही बडेजावाला बुजणारा. आयुष्यातील कृत्रीमता, बेगडीपणा टाकणारा जरा वेगळाच प्राणी! जीवनाचा नैसर्गिक निखळ आनंद, आस्वाद घेण्याची स्वाभाविक ओढ. माणसांपेक्षा निसर्गसान्निध्याची आवड. अर्थात जनसंपर्कही तसा प्रिय वाटतो. अनौपचारिक गप्पांच्या मैफिली अधिक प्रिय! सुखाच्या संकल्पना व्यक्ती गणिक वेगवेगळ्या असू शकतात, नव्हे आहेत!! सुख, समाधान, आनंद, शांती हे सारं काही कधी शोधावं लागत नाही, तसं ते शोधूनही मिळत नाही म्हणा.!!! ते आपल्याच मनोवृत्तीतून नि जीवनशैलीतून आणि वर्तशैलीतून प्राप्त होत असतं. मन बाहेरुन शांत असण्यापेक्षा आतून शांत असणं, ही प्रयत्न साध्य गोष्ट आहे. स्वानुभवांच्या काही विचारधारांच्या आधारे, मी माझी जीवननौका, माझी जीवननौका, माझी जीवन यात्रा – भवसागर सुखेनैव पार करीत आहे.

“उदंड उत्साहाचं अभंग लेणं जर अंतर्यामी कोरलेलं असेल
तर अखंड आनंदाचा निर्मळ निर्झर जीवनाचा अंग-प्रत्यंगांत
अविरत पाझरण्यास कधीच प्रत्यवाय नसतो”
तसेच
“आळस आणि कंटाळा या शत्रूंवर विजय मिळवणे,
हाच यशस्वी जीवनाचा माझा मंत्र आहे”
अशी माझी खात्री आहे, धारणा आहे.
मला वाटते,
“सत्यचरण हीच जीवनाची सार्थकता !
सत्य आणि परमेश्वर हे अभिला आहेत, एकरुप आहेत.
सत्याचरण म्हणजेच ईश्वराचे पूजन”
या माझ्या विचारसरणीला अनुसरुन म्हणावेसे वाटते,
जीवनांत जो सत्याची साथ कधीच सोडत नाही, त्याला आयुष्यांत कधीही मागे पहावे लागत नाही,
ईश्वर त्याच्या सदैव समीप असतो” जीवनाकडे अधिक अस्थेनं आणि आत्मीयतेनं पहाण्याची मला, जी सवय जडली, त्या मागे एक अविस्मरणीय घटना आहे. क्षणभंगूर जीवनाची नश्वरता अनुभवणारीघटना, माझ्या जीवनांत घ डली आणि गुरुकृपेने वाचल्यावर गुरु माऊलीवरील श्रद्धा बळकट झाली.
सुमारे बावीस वर्षांपूर्वी एका व्यवसायात माझ्याच आप्ताकडून लक्षावधी रुपयांची हानी झाली/फसगत झाली. जीवनाच्या विश्वासाला तडा गेला. आपले कोण आणि परके कोण संभ्रम पडला. नकळत हृद्रोग जडला. हृदयामध्ये सात ठिकाणी अवरोध निर्माण झाला. जीवन जगण्या मरण्याच्या सीमारेषा अंधुक झाल्या, धुसर झाल्या. अशावेळी ब्रीचकॅंडी रुग्णालयात सोळा वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. सुधांशुजी भट्टाचार्य यांनी ओपन हार्ट सर्जरी करुन माझे प्राण वाचविले. मृत्युचे रौद्र भीषण तांडव मी डावलुन पाहिले. डॉ. सुधांशुजी मला देव समान भेटले, माझी गुरुमाऊलीत मला त्यांच्या रुपात भेटली, माझा पुनर्जन्म झाला. डॉ. सुधांशुजींची छबी माझ्या दत्त गुरुमाऊली जवळ ठेऊन त्यांची मनोमन पूजा सुरु आहे.
या एका-हृदय हेलावणार्‍या घटनेमुळे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आमूलाग्र बदलून गेला. माझ्या सान्निध्यांत येणार्‍या व्यक्तीच्या मनांत मजविषयी चांगल्या भावना सदभावना नर्माण व्हाव्यात किमान कटुता तरी नसावी-यासाठी कळत न कळत माझी मनोमन तयारी जाली, तो माझा स्थायीभाव झाला.
उर्वरीत जीवन हर्षभरे पुलकित करण्याची उर्मी हृदयी उचंबळून आली. याच विचारसरणीतून, “विनोद, “निखळ विनोद”, हे आनंदी जीवनाचं अध्यात्म वाटू लागलं. मानवी जिवन आयुष्य हलकं फुलकं करण्याची ती गुरुकिल्ली आहे. कुणीस म्हटलं आहे :
”Smile is a curved Line
which puts every thing straight”
विनोद जादूची कांडी आहे – आनंद——आहे.
या आनंद——- महती जीवन सुसह्य करण्याकडे, सुखकारी करण्याकडे कारणी लावणे आपल्या हाती आहे शेवटी ईश्वरेच्छा बलियसी!
मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है,
वही होता है, जो मंजुरे खुदा होता है ।
सकारात्मक जीवन प्रणाली कर
्याच्या प्रयत्नांत मला म्हणावसि वाटतं :
सुख पाहतां डोंगराएवढे, दु:ख एवढे ।
तसेचजगीं सर्व सुखी असा तूच आहे ।
चंचल मना, तू स्थिरावूनि पाहे ।।
मी जाणून आहे, संतवचनांना जरी वरील प्रमाणे मुलगा दिला तरी, वास्तव विदारक आहे.
हे अशक्य जरी असलं, आपल्या मर्यादित जीवनांत प्रामाणिकपणाने आपापल्या परीनं प्रयत्न करण्यास काहीच हरकत नसावी. मात्र त्यासाठी सदाबहार चिरतरुण देवआनंद यांच्या गीताची साथ हवी :
“मै जिंदगीका साथ निभाता चला गया ।
हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया ।।
हर फिक्र को धुवे मे उडा ऽऽऽऽ”
रसिकहो हेच आणि एकमेव हेच, माझे जीवन सूत्र राहिले आहे,
हे सूत्रच माझ्या जीवनाची गीता आहे
धन्यवाद !

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..