नवीन लेखन...

जाने वो कैसे लोग थे – गुरूदत्त

माणसाने हळवे वा भाविनक असावे पण भावनेच्या पूरात वाहून जाऊ नये. कधी कधी संवेदनशिलता टोकाच्या भावनेत बदलते. जर ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील कलावंत असेल तर तिच्या कलाकृतीत हे सर्व झिरपत राहते. १९५७मध्ये प्रदर्शीत झालेल्या एका चित्रपटाची सुरूवात अशी आहे- ‘नायक एका बागेत झाडा खाली पहूडलेला आहे. त्याची नजर आकाशावर. आकाशात ढगांचे पांढरे पुजंके तर कधी पखं पसरून उडणाऱ्या घारी तो बघतोय. मग बागेतल्याच एका फुलावर त्याची नजर जाते ज्याच्यावर एक भूंगा घिरट्या घालतोय. अचानक तो भूंगा जमिनीवर बसतो आणि त्यावर कुणाचा तरी बूट असलेला पाय पडतो…… नायक एक क्षण त्या भूंग्याकडे बघतो आणि उठतो’…. दिग्दर्शकाने या एकाच दृष्यातुन चित्रपट खूप उंचावर नेऊन ठेवला. नायक आणि त्यांच्या स्वप्नचे पूढे नेमके काय होणार आहे हे या २ मिनीटांच्या प्रसंगातून अत्यंत समर्पकपणे मांडणारा दिग्दर्शक अभिनेता म्हणजे गुरूदत्त.

“प्यासा” मधील या पहिल्याच दृष्याने त्यावेळी सर्वांची मने जिंकून घेतली. लहानपणी आजी समईच्या प्रकाशात जेव्हा आरती म्हणत असे तेव्हा किशोरवयीन गुरूदत्त आरती समोर आपली बोटे नाचवून विविध मुद्रांची सावली भिंतीवर बघत बसत. यातून पूढे नृत्याची आवड निर्माण झाली. एकदा कोलकोत्ता येथे प्रख्यात सतार वादक रवी शंकर यांचे बंधू प्रख्यात नर्तक उदय शंकर यांच्याशी त्यांची गाठ पडली. दोघांनाही ऐकमेकांचे स्वभाव खूपच आवडले व गुरूदत्तने उदय शंकर यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवायला सुरूवात केली. बंगाली संस्कृतीचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर पडला आणि याच ठिकाणी त्यांनी आपले खरे नाव वसन्त कुमार शिवशंकर पादुकोण एवजी गुरूदत्त वापरायला सुरूवात केली. मग येथेच त्यांचा चित्रपट माध्यमाशी परीचय झाला. पूढे ते पूणे येथील “प्रभात” या मान्यवर कंपनीत दाखल झाले. येथे ते नृत्य दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक व अभिनेते असे सर्वच कामे करत. येथेच त्यांना देव आनंद सारखा मित्र मिळाला. दोघांची मैत्री एकदम घट्ट झाली. दोघांमध्ये एक करार पण झाला तो असा –की जर देव निर्माता झाला तर दिग्दर्श म्हणून गुरूदत्तला घेणार आणि गुरूदत्त निर्माता झाला तर नायक म्हणून देव आनंदला घेणार. आणि दोघांनीही आपापले वचन पाळले. गुरूदत्तच्या “सीआयडी” चित्रपटात देव आनंद मूख्य भूमिकेत होता तर देव आनंदच्या “बाजी” चित्रपटाचा दिग्दर्शक गुरूदत्त होता.

चित्रपटातील गाणे उत्कृष्टपणे कसे चित्रीत करावे यासाठी प्रसिद्ध असणारे दोन नावे म्हणजे विजय आनंद आणि गुरूदत्त. प्यासा मधील जाने वो कैसे लोग थे जिनको…..या गाणे जर बारकाईने न्याहळले तर झूम इन आणि झूम आऊट या तंत्राचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. गाण्याच्या ओळी आणि त्यानुसार फ्रेममधील नायीका जवळ आणि दूर जाणे किंवा नायक जवळ-दूर जाणे…. गुरूदत्त खूपच कल्पक होते. पण त्यापेक्षा अधिक भावनाशील होते. १९५९ मधील ‘कागज के फूल’ची चित्रपट कथा आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तव जीवन एक सारखेच घडले. फक्त ९ चित्रपटात ते प्रमूख नायक होते तर फक्त ६ चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वाचा दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. परदेशातही त्यांचे नाव आदराने घेतले जाई. भारताचा “ऑर्सन वेल्स”( हे एक प्रतिभावान अमेरिकन अभिनेते, दिग्दर्शक, लेखक व निर्माते होते) अशीही त्यांची एक ओळख होती.

असे म्हणतात की प्रेमातली विफलता आणि आयुष्याचे वास्तव हे कलावंताचे दोन महाभयंकर शत्रू असतात. प्रसिद्ध गायीका गीता रॉय त्यांची पत्नी गीता दत्त झाली. त्यांना तिन मुलही झाली. पण दूर्देवाने चित्रपटातला गुरूदत्त आणि वास्तवातला गुरूदत्त् सारखेच निघाले. वहिदा रहमान या अभिनेत्रीचे त्यांच्या पासून दूर जाणे ही त्यांच्या आयुष्यातली फार मोठी भळभळणारी जखम ठरली. १० ऑक्टोबर १९६४ च्या सकाळी गुरूदत्त मृत अवस्थेत आढळले. डॉक्टरांच्या अहवाला नुसार अती मद्द सेवन आणि अती झोपेच्या गोळ्या त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या. मृत्यूच्या वेळी ते अवघे ३९ वर्षांचे होते “कागज के फूल” चा शेवटही असाच होता.

-दासू भगत (९ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..