रिओ ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर चा जन्म ९ ऑगस्ट १९९३ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला.
भारताची ‘जिमनॅस्ट क्वीन’ अशी तिची ओळख असलेल्या दीपा कर्माकरने जेव्हा पहिल्यांदा जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तिच्याकडे जोडेदेखील नव्हते. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती जिम्नॅस्टिक कोच बिश्वेशर नंदी यांच्या मार्गदर्शनात ट्रेनिंग घेत आहे. जन्मापासूनच दीपाचे पाय फ्लॅट आहे आणि जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी हे बाधक असतं. असे पाय असणार्यांनना उडी मारल्यानंतर जमिनीवर लँड करताना बॅलेस करण्यात त्रास झेलावा लागतो. परंतू दीपाने अथक परिश्रम आणि अभ्यासाने आपली ही कमी दूर केली. २००७ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये शानदार प्रदर्शनानंतर दीपाचा उत्साह वाढला आणि ती अधिक अभ्यास करू लागली. दीपाने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.
२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर दिपा कर्माकरच्या नावाची चर्चा सूरू झाली होती. पण, तिला प्रसिद्धी मिळवून दिली ती ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर… शांत, लाजरी, स्वतःच्याच कोशात राहणारी दिपा स्टार बनली. पण, तिने आपले पाय जमिनीवरच ठेवले.
२०१५ च्या आशियाई जिम्नॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकणा-या दिपाला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. दुखापतीनंतर ती बराच काळ स्पर्धेपासून दूर होती आणि तिने वर्ल्ड चँलेंज स्पर्धेतील सुवर्णपदकाने कमबॅक केले.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या दीपा कर्माकरने भारताला जिमनॅस्टचे वेड लावलं. तिच्यामुळे जिमनॅस्टीक या खेळाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. मागल्या वर्षी संपन्न झालेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये तिने प्रोडूनोवा जिम्नॅस्टमध्ये अंतिम पाचामध्ये जागा बनवली आणि आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघाने तिला विश्व स्तरीय जिम्नॅस्टच्या पंक्तीत बसवले. दीपा कर्माकरनं आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७७ हून अधिक पदकांची कमाई केली आहेत आणि त्यात ६७ सुवर्णपदकं आहेत. FIG आर्टिस्टीक जिमनॅस्टीक जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. तिच्या या कामगिरीची दखल ‘बार्बी डॉल’ या प्रसिद्ध कंपनीनंही घेतली आणि त्यांनी चक्क दीपा कर्माकरच्या रूपाची बार्बी डॉल तयार केली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply