नवीन लेखन...

ह. भ. प. सोनोपंत दांडेकर

ह. भ. प. सोनोपंत दांडेकर यांचा जन्म २० एप्रिल १८९६ रोजी पालघर जिल्ह्यातील माहीम येथे झाला.

शंकर वामन दांडेकर उर्फ सोनोपंत दांडेकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ होते. ते सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते. सोनोपंत दांडेकर यांचे बंधू बाबासाहेब दांडेकर हे विद्वान व त्यागी देशभक्त. सोनोपंतांना घरचे उत्तम वळण, तशीच बुद्धिमत्ता व सात्त्विकता अशी अनुकूल परिस्थिती लाभली. घराजवळ वै. वा. जोग महाराज राहत. सोनोपंतांना त्यांच्या मुखातून श्रीज्ञानेश्वरी, भजन, कीर्तन ऐकण्यास मिळे. घराजवळ जसे जोग महाराज तसे कॉलेजात त्यांचे प्रोफेसर तत्त्वज्ञ गुरुदेव रा.द.रानडे हे होते. पुढे, दांडेकर स्वत: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले.

मामासाहेबांच्या ठायी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम; व ते संपल्यावर श्रीज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य सुरू होई. ते आयुष्यभर अखंड चालू होते. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी असोत, अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी, वाममार्गाला लागलेला मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचावण्याचे महान कार्य सातत्याने केले. मामासाहेबांनी त्यांच्या उदाहरणाने ‘तत्त्वज्ञानी मनुष्याने समाजापासून अलिप्त न राहता समाजामध्ये मिसळून त्यांच्यापुढे उत्तम ध्येय ठेवणे हे किती आवश्यक आहे, तसेच पारमार्थिक मनुष्य व्यावहारिक जबाबदारीसुद्धा किती उत्कृष्ट रीतीने पार पाडतो हे दाखवले आहे’ असे गुरुदेव रानडे यांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवले आहे.

मामासाहेब हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांनी लौकिक असा संसार केला नाही. ते अपरिग्रही जीवन जगले. ते निर्वाहापुरते ठेवून बाकीचा पैसा गरीब विद्यार्थी व वारकरी यांना वाटून टाकत. ते वडिलोपार्जित शेती व घरदार यांस कधीही शिवले नाहीत. त्यांनी ‘सार्थ श्रीज्ञानेश्वरी’ ग्रंथ छापून प्रसृत केला. मात्र त्यांनी त्यातील उत्पन्नातून स्वत:साठी कवडीचादेखील उपयोग केला नाही. ते स्वत: श्रीज्ञानेश्वरी जगले.

सोनोपंत दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला दिला जातो. म.वि. गोखले यांनी ठेवलेला हा पुरस्कार २०१६ साली शकुंतला आठवले यांच्या ‘भारतीय तत्त्वविचार’ या ग्रंथाला मिळाला आहे. २०१७ सालचा पुरस्कार डॉ. यश वेलणकर यांच्या ‘ध्यान विचार’ आणि डॉ. संज्योत देशपांडे यांच्या ‘अटळ दुःखातून सावरताना’ या पुस्तकांना विभागून दिला आहे.

सोनोपंत दांडेकर यांचे निधन ९ जुलै १९६८ रोजी झाले. त्यांची पुणे ते आळंदी अशी अंत्ययात्रा अभूतपूर्व निघाली होती. हजारो लोक अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यात सामील झाले होते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..