नवीन लेखन...

हा खेळ कुणाला दैवाचा कळला!

सामान्यांचा “असामान्य डॉक्टर” एका शुल्लक निष्काळजीपणाचा दुर्देवी बळी..

डॉ. दीपक अमरापूरकर हे जागतिक कीर्तीचे यकृताचे तज्ज्ञ डॉक्टर..! बॉम्बे हॉस्पिटलची शान, अचूक निदान करणारा, अतिशय बुद्धिमान डॉक्टर..! मूळ सोलापूरचा असलेला हा माणूस अतिशय कष्टातून आणि परिश्रमातून डॉक्टर झाला आणि आपल्या मनमिळाऊ हसतमुख स्वभावानं दुसर्‍याच्या मदतीला कायम तयार असायचा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं.

डॉ. अमरापूरकर यांचे आजाराबाबतचे निदान योग्य असायचे. पटकन ते निदान करायचे. रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास होता मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत. अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’ च्या काळात बालपण आणि जडण घडणीचा काळ याविषयी लिहिताना ते अनेक आठवणीत हरवून जायचे. त्या वेळी दीपक अमरापूरकर हे नाव हमखास त्यांच्या तोंडी असायचं. ‘मुसाफिर’ प्रसिद्ध झालं. त्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा उल्लेखही आहेच.

…’ असा कसा गेला हा माणूस अचानक..? मुंबईच्या पावसानं हे का आणि काय करून ठेवलं..? बॉम्बे हॉस्पिटलमधून मंगळवारी घरी येण्यासाठी निघालेले डॉ. दीपक अमरापूरकर आपल्या घराच्या अगदी जवळ येऊन पोहोचले होते. ट्रॅफिक जाम होता, कमरेइतकं पाणी रस्त्यावर होतं..आपण चालत गेलो तर दहा मिनिटांत घरी पोहोचू असं त्यांना वाटलं. त्यांनी आपल्या बायकोला अंजलीला मी दहा मिनिटांत घरी येतोय असा फोन केला. ड्रायव्हरला तू गाडी घेऊन ये सावकाश असं सांगितलं आणि ते गाडीतून उतरले. हातात छत्री,पाऊस कोसळतोय आणि अचानक उघड्या असलेल्या ड्रेनेजच्या मेनहोल मधून ते गायब झाले. त्यांचा मृतदेह १० किमी दूर अंतरावर असलेल्या वरळी सीफेसला दोन दिवसांनी मिळाला.त्यांच्या हातातल्या घड्याळावरून त्यांची ओळख पटली.

सर्वसामान्य माणसाचं जीवन महत्त्वाचं आहेच, पण जो डॉक्टर रोज अनेक लोकांना जीवदान देत होता, आपल्या देशासाठीच नव्हे तर जगातल्या यकृताच्या विकारानं ग्रस्त असलेल्या कुठल्याही रुग्णासाठी हा माणूस असणं खूप खूप आवश्यक असताना..अशा प्रकारे मृत्यू त्यांना यावा..? असं का झालं..?, कोणाची चूक…?, वगैरे प्रश्‍नांचा विचार या क्षणी तरी डोक्यात शिरतच नाहीये. एलफिन्स्टन पश्चिम भागात त्यांनी आपली गाडी सोडली होती. गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत. पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचं झाकण काढलं होतं. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले.

आपल्या देशाचे आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे..अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला ते अत्यंत खेदकारक आहे. तो धक्कादायक म्हणावा लागेल. त्यांचे व्यक्तीमत्व, तज्ज्ञता असूनही साधेपणाने जगण्याची वृत्ती आणि माणूसकी मात्र कायमच स्मरणात राहील..अशा या डाॅक्टर मित्राला भावपूर्ण श्रध्दांजली..!

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..