इरावतीने नेहमीचे वर्कआउट संपवले . नीपकिनने मानेवरचा घाम पुसत सॅक मधली लेमन ज्युसची बाटली तोंडाला लावली . तेव्हड्यात मोबाईल वाजला .
” हाय ,ईशांक . आणखीन तासभर तरी लागेल . जस्ट वर्कआउट संपलय . घरी जाऊन चेंज करून येतच . ” तिने ईशांक काय म्हणतोय हे न ऐकताच फोन कट केला . काय म्हणणार ? ‘ तशीच ये ! चेंज बिंजच्या भानगडीत नको पडूस ‘ . इरावतीने जिमचे शूज पॅक करून सॅक मध्ये टाकले . नेहमीचे कॅज्युल स्पोर्ट शूज पायात घातले . जॅकेटअंगात घालून सॅक पाठीला लावली . पुन्हा मोबाईल वाजला . हा ईशानक ना कधी कधी खूप पझेसिव्ह होतो ! पागल झालाय !
“अरे , निघतोय ना ईशांक ! किती घाई —-”
” मी तुमचा ईशांक नाही ! पण तरी माझे बोलणे लक्ष पूर्वक एका ! ” फोनवरचे तिचे वाक्य एका भारदस्त आवाजाने तोडले . त्या थंडगार आवाजाने इरावतीच्या अंगावर काटा आला . इरावतीने झटक्यात फोनच्या डिस्प्लेवर नजर टाकली . अननोन नम्बर होतो ! तिला आश्चर्य वाटले . कारण हा तिचा पर्सनल नम्बर होता . फक्त जवळच्या लोकांना दिलेला !
” सॉरी , कोण बोलताय ?आणि हा नंबर तुमच्या कडे कसा ? कोण दिला ?”
” या क्षणी या सर्व गोष्टी गौण आहेत ! मलाहि महत्व नाही . फक्त तुमच्या साठी असलेला निरोप देण्यासाठी माझी नियुक्ती झाली आहे ! तो निरोप असा –‘ तुम्ही आत्ता ज्या मॉलच्या जिम मध्ये आहेत , तो काही वेळातच ब्लास्ट होणार आहे ! सध्या मॉल मध्ये पाच हजार आठ शे सत्तावीस लोक आहेत !वेळ कमी आहे !हरी ,सेव्ह देम ! ‘ ” फोन कट झाला !
इरावती क्षणभर सुन्न झाली . मॉल ब्लास्ट होणार ? हेच आपण ऐकले ना ? बापरे ! झटक्यात तिने तोच नंबर रिडायल केला . दोनदा रिंग वाजली . पुन्हा कसलाही रिस्पॉन्स नाही !
तिने कौल साहेबाना रिंग केली .
“इन्स्पेक्टर ,इरावती हेयर ! सर !”
” बोल ,इरा ! ” कौलाचा स्वर सलगीचा होता . ते इरावतील मुली सारखेच मानीत असत .
” सर , अननोन कॉल ! कलर्स मॉल ब्लास्ट होणार !हा मेसेज !काय करू ?”
कौल विचारात पडल्या सारखे झाले .
” इन्स्पेक्टर , तुम्हाला माहीतच आहे , पब्लिक प्लेसेसवर टेरेरिस्टचा डोळा असतो ! डू द निडफूल !” कौलनी ऑफिशियल आवाजात उत्तर देऊन फोन कट केला ! शेवटी ते सुपीरियर पडले ना ! निर्णय तुमचाच , परिणाम तुम्हीच फेस करा , क्रेडिट फक्त मला द्या ! यात नवल ते काय ? कुठल्याही मॅनेजमेंटचा हा अलिखित नियम असतो !
इरावती मात्र पेचात अडकली होती . फोन खरा असेल का ? का कोणी मस्करी केली असेल ? काय करू ? का दुर्लक्ष करून सरळ घरी चेंज करून ईशांक सोबत एन्जॉय करू ?पण तसे आता करता येणार नाही . कौल सरांना फोन करून ठेवलाय ! धमकी खरी निघाली तर ? पाच हजारावर जीव जातील ! शिवाय बेजवाबदारीचा ठपका . इतकाच नाही तर आयुष्य भर आपण स्वतः ला माफ नाही करू शकणार ! आणि समजा या धमकीवर विश्वास ठेवून मॉल रिकामा केला ,अन काहीच घडले नाही तर ? लोकांची टोमणे , वरिष्ठांचा रोष , आणि भक्कम गाढवपणा गळ्यात पडण्याचा धोका होताच . इतक्या दिवसाच्या प्रामाणिक कामावर बोळा फिरणार होता !काय करू ?
धमकी खरी ठरो वा खोटी , सावधगिरी बाळगलीच पाहिजे ! पाच हजारावर जीव धोक्यात आहेत . तेव्हा मॉल लवकरात लवकर रिकामा करणे गरजेचे होते ! तिचा निर्णय झाला !
000
इराने ब्लूटूथ ऑन केला .
“हॅलो ,कंट्रोल रूम ! इन्स्पेक्टर इरावती हेयर ! इमर्जन्सी !
“मी प्रशांत , इन्चार्ज ऑन ड्युटी ! बोला !”
“कलर्स मॉल ब्लास्ट होणार . अननोन नंबरवरून मेसेज आलाय !”
” तो फोन नंबर सायबर सेलला किंवा मला फॉरवर्ड करा . बाकी सोय करतोय ! ”
“मी तो नंबर पाठवलाय ! लोकेशन ट्रेस करा . लगेच मला काळवा !”
“ओके ! अँटी टेररिस्ट स्क्वाड ला कळवू का ?”
क्षणभर विचार करून ,इराने होकार दिला . नाहीतरी त्यांची मदत घ्यावीच लागणार होती !
इराने जिमच्या मॅनेजरला मॉलची कंट्रोल रूम कोठे आहे ते विचारून घेतले . ती लिफ्ट कडे धावली . लिफ्ट खाली येत होती , तोवर तिने मारियाला फोन लावला . मारिया, इराची इंफॉर्मर, मॉलच्या सलून मध्ये कामाला होती . सलून ,मसाज , स्पाच्या नावाखाली नको ते धंदे चालतात . या साठी इराने हि सोया केली होती !
“मारिया ,आत्ता किती लोक आहेत तुझ्या सलून मध्ये ?”
” ऐट अंडर ट्रेंटमेन्ट , ट्वेल्व्ह वेटिंग !”
“आणि तुम्ही आर्टिस्ट आणि अससिस्टंट्स ?”
” पंधरा ! ”
” तुम्ही पस्तीस जण ताबडतोब शटर बंद करून मॉल बाहेर पडा ! पंधरा मिनिटाच्या आत ! ”
“पण का ?”
“आतंकवाद्यांच्या हिट लिस्ट वर मॉल आहे ! घातपात कधीही होऊ शकतो ! अगदी या क्षणी सुद्धा ! ”
“पण –”
“पस्तीस जीवाची जवाबदारी तुझी ! ”
लिफ्ट मध्ये शिरता शिरता इराने फोन कट केला .
पाचव्या मजल्याचा अर्धा फ्लोअर वर कंट्रोल रूम होती . ती तीरा सारखी आत घुसली .
“अटेन्शन एव्हरी बडी . मी इन्स. इरावती !इमर्जन्सी आहे ! इथे इन्चार्ज कोण ?”
मिलिटरी वेशषतला , ‘ धटिंगण ‘या शद्बाचा मूर्तिमंत साडेसहा फुटी अर्थ ! , क्रिकेटचे ग्लोज सारखा आपला पंजा पुढे करत तो नरदेहधारी इरावती समोर सरसावला .
“रिटायर्ड कॅप्टन भीमा शंकर ! व्हॉटस प्रॉब्लेम ?”
इरावतीने दोन्ही हात जोडून भीमाशंकरला नमस्कार केला ! आणि थोडक्यात आलेल्या फोनची आणि मॉल ब्लास्टच्या धमकीची कल्पना दिली .
” साला , पागल है क्या ? ऐसे कैसे ब्लास्ट होगा ? सब रूमर होता है ! चारबार ऐसी धमकी आई थी , कुछ नाही हुवा ! ”
“पर हमे सावधानी बरतनी होगी , सर ! अब तक नाही हुवा तो अबभी नाही होगा , ऐसे सोचना गलत है !”
भीमाशंकरने इराला पाया पासून डोक्यापर्यंत घाणेरड्या नजरेने एकवार न्याहाळले .
“आय कार्ड ?” त्याने हात पुढे करत विचारले . इराने आपली पितळी बॅच दाखवली . त्याने आपल्या असिस्टंटला खूण केली . त्या असिस्टंटने आवश्यकते डिटेल्स आपल्या लॅपटॉपवर घेतले . बॅचचा फोटो काढून घेतला .
“थोडा रुक्क !” तिरसट आवाजात इराला म्हणत ,त्याने कोठे तरी फोन लावला . बहुदा मॉलच्या मालकाशी बोलत असावा . तो बराचवेळ फोनवर एकात होता . इराची बेचैनी वाढत होती . तिचा मोबाईल वाजला . ईशांक होता !
तिने कसलाही विचार न करता त्याला ब्लॉक केले !
” हा तो तेरा क्या नाम बताया ? इरावती ! देख पगली, अब ये सारा मॉल का कंट्रोल तरे को देनेको मालिक बोला , और उपरसें तेरेको कोऑपरेटभी करनेको कहा है ! ”
” थँक्स ! मॉलका फ्लोअर प्लॅन , सायबर युनिट इन्चार्ज , इलेक्ट्रिसिटी इन्चार्ज ,और सेक्युरिटी हेड को आपकी केबिन मे बुलालो !”इराने सर्व सूत्र हातात घेतली .
इराचा फोन वाजला . पोलीस कंट्रोल रूम होती !
“हा प्रशांत , फोनचे लोकेशन ट्रेस झाले का ?”
” मॅम नंबरच ट्रेस होत नाहीय ! प्लिज पुन्हा तो नंबर मला पाठवा . ”
इराने पुन्हा तो नंबर फॉरवर्ड केला . आणि ती भीमाशंकरच्या केबिन मध्ये गेली . सगळे तेथे जमले होते .
” मला आधी फ्लोअर प्लॅन बघू ”
“मॅम , मॉलचे व्हर्टीकली दोन भाग होतात . डाव भाग चौथ्या मजल्या पर्यंत पार्किंग साठी आहे . उजव्या बाजूच्या भागात फ्रँचाइज आणि त्यांची दुकाने आहेत ! ”
“ओके ! मल्टिप्लेक्स ?”
“चार स्क्रीन आहेत ! टॉप फ्लोअर ला !”
“आत्ता सिनेमा चालू आहेत ?”
“नाही पण तासाभरात दोन स्क्रीन सुरु —-”
“आजचे सगळे शो सस्पेंड करा ! ”
“पण बुकिंग —”
“अहो , जीवा पेक्षा सिनेमा महत्वाचा आहे का ?”
तो शोज कॅन्सल करण्याच्या कामासाठी पळाला .
” सेक्युरिटी , या मॉल मधला प्रत्यक्ष माणूस बाहेर काढायचा आहे !तेही कसलाही गडबड गोंधळ न होवू देता . पोलीस फोर्स पोहचेल तेव्हा पोहचेल ! हा तर हे कसे करता येईल ? भिमा शंकरजी ? एनी सजेशन ?”भीमा शंकर फक्त कडवट हसला . येथे डोके लावण्यात अर्थ नव्हता हे इराच्या लक्षात आले .
” इले . इन्चार्ज , शोर्ट सर्किट किवा इतर काही धोका असेल तर लक्ष ठेवा ! आणि हो ग्राउंड फ्लोअर वरून वर येणारे सर्व एस्केलेटर्स ताबडतो बंद करा ! फक्त खाली जाणारे चालू ठेवा .! हरी ! ” इरावती भराभर सूचना देत होती .
इराचा फोन वाजला .
” राणी ,अलीस का ? आणि तुझी टीम ?”
“रिपोर्टिंग ! ”
” बाहेरच थांब ! मॉलचा एंट्रन्स सील कर ! एकही नवीन माणूस मॉल मध्ये शिरता कामानये ! मी मॉलच्या सेक्युरिटीला तुझ्या मदतीला पाठवते आहे . ”
” पण का मॅडम ? काय झालाय ?”
“सांगते तेव्हड कर ! ” इराचा सूर चिडका झाला . पण तिने चटकन स्वतःला सावरले . तिचे टेन्शन क्षणा क्षणाला वाढत होते .
” सायबर युनिट कोणाकडे आहे ?”
” मी राकेश , माझ्या कडे !”एक पोरगेलासा वेडीवाकडी दाढी वाढवलेला तरुण पुढे आला .
“राकेश , सीसी टीव्ही मॉनिटर वरची नजर काढू नकोस . काही संशयास्पद वाटले तर लगेच कळावं . आणि हो , तुम्ही मॉल मध्ये मेसेजस कसे पाठवता ?”
“मॅम , या येथे ऑडिओ / व्हिडीओ लोड केली कि मॉलच्या कान्या कोपऱ्यात पोहंचते ! “त्याने एका डेक कडे बोट दाखवत सांगितले .
” मग मला माईक दे . आणि व्हिडीओ घे ! ”
राकेशने माईक इराला दिला आणि आपला मोबाईल व्हिडीओ मोडवर सुरु केला .
” नमस्कार , मी इन्स्पेक्टर इरावती . कृपया माझे बोलणे काळजीपूर्वक ऐका , आज आपला हा मॉल ‘मॉक ड्रिल ‘साठी निवडला गेलाय . हा मॉल आपल्याला केवळ दहा मिनिटात रिकामा करायचा आहे ! केवळ दहा मिनिटातच ! उद्या अतिरेकी हल्ल्याच्या क्षणी किंवा अपघाताच्या प्रसंगी गोंधळ होऊ नये म्हणून हि ‘ रंगीत तालीम ‘ आहे . कृपया सहकार्य करावे ! धन्यवाद ! ”
राकेशने जुबुबी एडिट करून ती व्हिडीओ आणि ऑडिओचे प्रसारण सुरु केले !
०००
” सर , मी गोपाळ रिपोर्टर . कलर्स मॉल मध्ये काहीतरी गडबड आहे ! ”
” गोपाळ , नक्की काय झालाय ?”
“पोलिसांनी मॉलचा एंट्रन्स बंद केलाय ! ”
” का ?”
“माहित नाही ! पण नक्की मेजर प्रॉब्लेम असावा ! बापरे ,सर मॉल रिकामा करण्याचे कोणीतरी आवाहन करताय !”
दहा मिनिटात डोक्यावर उलटी ‘ छत्री ‘ घेऊन टीव्ही चॅनलची व्हॅन ‘लाईव्ह टेलिकास्ट ‘ साठी डुलत डुलत निघाली होती !
००००
“मॅम ,सर्किट प्रॉब्लेम नाही . वर येणारे एस्केलेटर्स बंद केलेत . पण लोक लिफ्ट आणि पायऱ्या वापरताहेत ! ”
“डॅम इट ! हे माझ्या लक्षात कसे आले नाही ?”
एव्हाना इराला मेनन ,कुमार आणि मोहन जॉईन झाले होते .
“मोहन , प्रत्येक मजल्याच्या प्रत्येक स्टेयर केस जवळ एक एक माणूस ठेव , वरच्या बाजूस कोणासही येऊ देऊ नकोस !”
“कुमार , सेक्युरिटीच्या पोरांना घेऊन लिफ्ट मॉनिटर कर . ! गो ! ”
कुमार निघून गेला .
इराचा फोन वाजला .
” बोल राणी !”
” मॅम , बाहेरची पब्लिक गोंधळ करतीय ! लवकरच हा गोंधळ हाता बाहेर जाण्याची लक्षणे आहेत ! कारण न्यूज चॅनलची व्हॅन अली आहे ! लोक भडकतील असे प्रश्न ते विचारत आहेत !”
संकट एकटी येत नाहीत , नको त्यावेळी टीव्ही चॅनल्स घेऊन येतात !
” माझे प्रसारण मॉल बाहेरील मोठ्या स्क्रीनवर टेलिकास्ट कर ”
ती राकेश कडे वळून म्हणाली !
मॉल बाहेर इरा मेगा डिस्प्लेवर दिसू लागली .
०००
इराचा फोन झाला तसे कौलनी आपले सारे फोन आणि लँडलाईन ऑफ केले होते ! इरा . वेडी मुलगी नको तो निर्णय घेणार याची त्यांना कल्पना होती . पेपरवाले , टीव्ही वाले , मंत्री संत्री ,होममिस्टरचे ऑफिस ,आणि एखादेवेळेस मुख्यमंत्री सुद्धा ,सगळे ‘बाप ‘ चौकशी आणि जाब विचारून हैराण करणार होते ! पण फोन बंद करून त्यांची सुटका नव्हती ! टीव्हीवर मॉलचे लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाले होते ! जगभर चॅनलवाले नाचणार होते ! कौल डोक्याला हात लावून बसले होते !
०००
जिने , एस्केलेटर्स , लिफ्ट्स भरभरून ग्राउंड फ्लोअरच्या दिशेने जात होते .कंट्रोल रूम मधून , ‘शटडाऊन ‘चा मेसेज प्रत्येक दुकानाला जात होता . तरी बरेच लोक अजून मॉल मध्ये होतेच . मॉल बाहेरचे लोक ‘आत सोडा ‘ म्हणून ‘प्रेशर ‘ वाढवत होते , तर आतले लोक बाहेर जाताना रेंगाळत होते ! आणि वेळ सुपर फास्ट गतीने संपत होता .
मॉल सारखी वास्तू रिकामी करणे वाटले तितके सोपे नाही याची इराला जाणीव होवू लागली .
“मॅम , टॉप फ्लोर अँड फूड कोर्ट्स टोटली रिकामी झालीत ! ”
“ओके . सगळी किचन्स तपासलीत का ? परटीकुलरली गॅस कनेक्शन बंद केलेल्याची खात्री करून घेतलीत का ?”
“न , नाही . पण आत्ता पहातो . ”
बाहेर कुठेतरी ढांण ,ढाण करत फायर ब्रिगेड च्या गाड्या , ऍम्बुलनकसचे सायरन , पोलीस फोर्स च्या गाड्याचे आवाज ऐकू येत होते .
०००
हा ,हा , म्हणता दोन अँटी टेररिस्ट स्क्वाडचे जवान मिलिटरी ट्रक मधून शिस्तीत उतरले . सोबत बॉम्ब शोधक पथक ,त्यांची ती ट्रेंड कुत्री , गॅस मास्क सगळंच आलं . त्यांनी मॉलचा ताबा घेतला . एव्हाना निम्मा मॉल कसा बसा रिकामा झाला होता , पण स्क्वाडच्या नुसत्या बुटांच्या आवाजाने लोक मॉल बाहेर पळाले ! वातावरण एकदम गंभीर झाले . मॉल मधून बाहेर येणारी शेवटची व्यक्ती होती , थकलेली इरावती ! इराचा फोन वाजला
” हा प्रशांत बोल ?”
” एव्हाना फोर्स मॉलवर पोहोचला असेल ! मी रवाना अलर्ट केले होते . दुसरे महत्वाचे , तुमच्या त्या अननोन फोनचे लोकेशन ट्रेस झालाय ! ”
“कुठाय ?”इराने उछुकतेने विचारले .
“कलर्स मॉलच्या आसपासच ! ”
०००
अँटी टेररिस्ट पथकाने सलग पाच तास मॉलचा इंच ना इंच तपासला . त्यांना संशय होता तो पार्किंग लॉट ,किचन गॅस लिकेज , आणि शॉर्ट सार्केटिंगचा ! कोठे काहीहि सापडले नाही ! तेथे असलेले सर्वजण इरा कडे ‘काय मूर्ख मुलगी आहे !’ या नजरेने पाहत होते .
” कहा है ओ इन्पेक्टर ? ” अँटी टेररिस्ट पथकाचा तो धिप्पाड अधिकारी गरजला .
” ओ देखो वहा, कारकी डिकी खोलकर बैठी है ! बिलकुल पगली है ! “कॅप्टन भीमाशंकरने दूर बसलेल्या इराकडे निर्देश केला , तसा तो अधिकारी ताड ताड पावले टाकत इरा कडे गेला . इरा कशी बशी उठून उभी राहिली . खाली मान घालून .
” क्या नाम है , तुम्हारा ?”
” इन्स्पेक्टर इरावती . ”
“नजर मिलाके जवाब दो ! ”
इराने तडक डोके वर करून त्याच्या दगडी चेहऱ्याकडे पहिले . त्याच्या डोळ्यात विशिष्ट चमक होती .
“इरावती ! आपको पता है ,अपने क्या किया है ?”
” जी मैने जो मुझे ठीक लगा —–”
” इरावती , अपने बिलकुल सही ऍक्शनली है ! बडी खुबसुत तारिकेसे अपनी ड्युटी निभाइ है ! अब यह तो अच्छाही हुवा के सबकुछ ओके निकला , कई जाने बची ! वेल डन माय चाईल्ड ! ” तो हलक्या फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला . खाड्कन अबाउट टर्न करून निघून इतर अधिकाऱ्यांच्या गराड्यात घुसला .
सगळेच ठीक होते . स्क्वाड लीडर , हजर असलेले पोलीस अधिकारी , मॉलचा कॅप्टन भीमाशंकर सर्व जण कोंडाळा करून उभा होते . सर्वानुमते असे ठरले कि , मॉलला कसलाही धोका नाही .
” तो सरजी ,क्या मॉल फ़िरसे शुरू किया जाय ?” भीमाशंकरने आपल्या भसाड्या आवाजात विचारले .
” एस , गो अहेड ! ”
आनंदाने भीमाशंकरने एक पाऊल मॉलच्या दिशेने उचले .
प्रथम डोळे दिपवणारा प्रकाश चमकला . !
मग पायाखालची जमीन किंचित थरथरली .!
कानठळ्या बसवणारा आवाज झाला . !
धूळ ,धूर आणि आगीचा प्रचंड लोळ आकाशात झेपावला !
डोळ्यादेखत त्या मॉलच्या ठिकऱ्या आसमंतात उधळ्या गेल्या ! मोल ब्लास्ट झाला होता !
०००
आता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘ हे टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते !
०००
इरा भकास नजरेने जळणाऱ्या मॉलकडे पहात होती !
“इरा , निघुयात ?”
इराने आवाजाकडे पहिले . ईशांक उभा होता . त्याच्या हातात एक छोटसे सॅन्डविच होते !
“भूक लागली असेल ना ? खाऊन घे . मग निघू . ”
इराला आधार देत ईशांक तिला घेऊन गाडी कडे निघाला . इराचा फोन वाजला . खिशातला फोन काढून ऑन करी पर्यंत रिंग बंद झाली . तोच अननोन नंबर ! इराने रिडायल केले .
” आपण संपर्क करू इच्छिता तो क्रमांक अस्तित्वात नाही ! कृपया क्रमांक तपासून पहा . पाच हजार आठशे सत्तावीस जीव वाचवल्या बद्दल धन्यवाद !!”
इरा वेड्या सारखी फोन कडे पाहत राहिली .
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे . पुन्हा भेटूच . Bye .
## This Number Dies Not Exist – A Short Story