नवीन लेखन...

हा सागरी किनारा….. लाचखाऊ राजकारण्याचे गाणे

हा सागरी किनारा…………………………. हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा…………………………. ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा…………….. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा

हा सागरी किनारा…………………………. हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा………………………….. ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा………………. मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा

मी कालचीच भोळी…………………………. तू कालचाच भोळा
मी आज तीच येडी…………………………. अन् आज तोच येडा
ही भेट येगळी का…………………………. ही भेट येगळी बा
न्यारीच आज गोडी…………………………. न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी? वळखून घे इशारा……………. ना भूल ही जराबी, वळखला मी इशारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा………………. मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा

होते अजाणता मी………………………….. होतास अजाणता तू
ते छेडले तराणे……………………………. मी छेडले तराणे
स्विकारल्या सुरांचे………………………….. मंजुळ मम सुरांचे
आले जुळून गाणे………………………….. आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा……………… हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा……………… मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा

बोलू मुकेपणाने……………………………. बोलू मुकेपणाने
होकार ओठ देती………………………….. होकार ओठ देती
नाती तनामनांची…………………………… नाती तुझी नि माझी
ही एकरूप होती…………………………… भावाभावांची होती
एकान्‍त नाचतो हा फुलवूनिया पिसारा………………. येथेच नाचतो मी फुलवूनिया पिसारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा……………….. डोळ्यांस मिटल्या दिसे एक उंच मनोरा

– जगदीश खेबूडकर…………………………. – आकाश विहारकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..