नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या सर्व अवयवांना पोषक असा हा व्यायाम आहे. कित्येक वर्षे त्याचे नियमित पालन केले जात आहे.
एक दिवस सकाळी फिरण्यास बाहेर पडलो असता, रस्त्यामध्ये एक ९ ते १० वर्षाचा शाळकरी मुलगा रस्त्याच्या कडेला थांबून आपली नादुरुस्त सायकल ठीक करण्याचा प्रयत्न करीत होता. सायकलच्या पायड्ल जवळची साखळी ( चेन ) ही बेरीन्गच्या चाकावरुन निसटली होती. मुलगा परेशान झालेला होता . त्याची सर्व बोटे व हात वंगनाणी बरबटलेली होती. शाळेची वेळ होत असल्यमुळे त्याच्या चेहऱ्यावर तगमग स्पष्ट दिसत होती. लोक जात येत होते. बहुतेकजन आपल्या समयबद्धतेमुळे धावपळीत होते. मी अचानक त्याचा जवळ गेलो. त्याचा सायकलीची निसटलेली चेन थोडासा प्रयत्न करून पूर्ववत केली. त्याला हातरुमाल दिला. त्यांनी हात साफ केले. त्याची सायकल त्याचा हाती दिली. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. माझे आभार मानून तो शाळा गाठण्यासाठी वेगाने निघून गेला.
तस म्हणाल तर मी फारस कांही केल नव्हत. म्हंटल तर क्षुल्लक. परन्तु कसलेसे समाधान, शांतता, मनला आनंदीत करीत असल्याची जाणीव येत होती. रोजच्या फिरण्याच्या व्ययामामुळे मनाला उल्हसित वाटण्याचे जेवढ़े कार्य झाले नव्हते, तेवढे त्या छोट्याशा प्रसंगाने झाले. व मानसिक समाधान लाभले.
शारीरिक व्यायाम ही जरी गरज असली, तरी मानसिक समाधान ज्या योगे प्राप्त होते, तो हाच खरा बौद्धिक व्यायाम नव्हे काय?
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply