असे असो,– तसे नसो,बातां त्या केवढ्या,–?
मग ना तिन्ही त्रिकाळ,
गप्पांच्याच रेवड्या, –!!!
कुणी शेखचिल्ली येतो,
कशा मारीत पोकळ बढाया, कृतिशून्य त्याच्या वागण्यात,
केवळ थापा लोणकढ्या–!!!,
असे करतो,– तसे करतो,
किती असती फुशारक्या,
सतत बाकीचे वाट पाहत,
याचा अत्तराशिवाय फाया,–!!!
कर्तृत्व मी गाजवतो,
भूलथापाच उधाणत्या,
येता सामोरी तसे आव्हान,
पळतो मागे लावून पाया,–!!!
संकटांना तोंड देतो,
निव्वळ पुढे करत दुसऱ्या, त्याच्यामागे लपत लपत,
अर्धा जन्म जाई वाया,–!!!
नियतीला कसे फटकारतो,
पोळत पोळत तिच्या चटक्या,
अंग हळूच काढून घेत,
शेवट हजर ओरडांया,–!!!
जो येतो तो छेडतो,
हा तयार वार्तालापां,
ठांसून आपले म्हणणे सांगत,
पळून जातो आपल्या गावा,–!!!
मी करतो, मी करतो,
गोष्टी नुसत्या उफाळत्या,
तू फक्त रहा बघत,
खेचून आणीन स्वप्नातल्या,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply